NIRF Ranking : नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्ककडून आज २०२४ सालच्या मानांकनाच्या (Ranking) नवव्या आवृत्तीत आज जाहीर झाली. त्यामध्ये ‘आयआयटी मद्रास’ने देशातील सर्वोत्तम उच्चशिक्षण संस्थेचा मान पटकावला आहे, तर ‘आयआयटी मुंबई’ तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरे स्थान पटकावलं आहे, तर यंदाच्या शीर्षस्थ विधी संस्थांमध्ये पुण्याच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलने पाचवे स्थान मिळवल आहे. आयआयटी मुंबईने नवाचाराच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
CIB Score: आरबीआयकडून सिबील स्कोरबाबत मोठे बदल; काय आहेत बदल? अन् केव्हा होणार लागू?
देशातील अव्वल विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि फार्मसी क्षेत्रातील उच्चशिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०१५ पासून नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क पद्धत स्वीकारली. देशातील ५८ हजार उच्च शैक्षणिक संस्थांपैकी यंदा ६,५१७ शैक्षणिक संस्थांनी मानांकन स्पर्धेत भाग घेतला. विविध श्रेण्यांसाठी १०,८४५ अर्ज करण्यात आले होते. आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उच्चशिक्षण संस्थांचे मानांकन जाहीर करण्यात आलं. दरम्यान, ‘एनआयआरएफ’च्या नवव्या आवृत्तीत राज्य विद्यापीठ, खुले विद्यापीठ, कौशल्य विद्यापीठ अशा तीन नव्या श्रेण्यांची भर घालण्यात आली आहे.
देशातील सर्वोत्तम संस्था
१. आयआयटी, मद्रास.
२. आयआयएससी, बंगळूर.
३. आयआयटी, मुंबई.
४. आयआयटी, दिल्ली..
५. आयआयटी, कानपूर.
६. आयआयटी, खरगपूर.
७.अ.भा. आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली
८. आयआयटी, रुडकी.
९. आयआयटी, गुवाहाटी.
१०. जेएनयू, दिल्ली.
देशातील अव्वल विद्यापीठे
१. भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर
२. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
३. जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली
४. मणिपाल अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन
५. बनारस हिंदू विद्यापीठ
६. दिल्ली विद्यापीठ
७. अमृता विश्व विद्यापीठ
८. अलीगड मुस्लीम विद्यापीठ
९. जादवपूर विद्यापीठ
१०. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था
१. आयआयटी, मद्रास.
२. आयआयटी, दिल्ली.
३. आयआयटी, मुंबई.
४. आयआयटी, कानपूर.
५. आयआयटी, खरगपूर.
६. आयआयटी, रुडकी
७. आयआयटी, गुवाहाटी
८. आयआयटी, हैदराबाद
९. एनआयटी, तिरुचिरापल्ली
१०.आयआयटी,-बीएचयू, वाराणसी
देशातील अव्वल वैद्यकीय महाविद्यालय
१. अ.भा.आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली
२. पीजीआयएमईआर, चंडीगड
३. ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर
४. एनआयएमएचएनएस, बंगळूर
५. जेआयपीएमईआर, पुडुचेरी
६. अमृता विश्व विद्यापीठ
७. संजय गांधी पीजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
८. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी
९. कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल
१०.श्री चित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी
सर्वोत्तम मॅनेजमेंट शिक्षण संस्था
१. आयआयएम, अहमदाबाद
२. आयआयएम, बंगळूर
३. आयआयएम, कोझिकोड
४. आयआयएम, दिल्ली
५. आयआयएम, कोलकाता
६. आयआयएम, मुंबई
७. आयआयएम, लखनौ
८. आयआयएम, इंदूर
९.एक्सएलआयआय, जमशेदपूर
१०. आयआयटी, मुंबई
देशातील सर्वोत्तम महाविद्यालये
१. हिंदू कॉलेज, नवी दिल्ली
२. मिरांडा हाऊस, नवी दिल्ली
३. सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली
४. रामकृष्ण मिशन विवेकानंद शताब्दी कॉलेज, कोलकाता
५. आत्माराम सनातन धर्म कॉलेज, नवी दिल्ली
६. सेंट झेव्हियर्स कॉलेज, कोलकाता
७. पीएसजीआर कृष्णमल महिला कॉलेज, कोईम्बतूर
८. लोयोला कॉलेज, चेन्नई
९. किरोडीमल कॉलेज, दिल्ली
१०. लेडी श्री राम महिला कॉलेज, दिल्ली
राज्यांतील अव्वल विद्यापीठे
१. अन्ना विश्वविद्यालय, चेन्नई
२. जाधवपूर विश्वविद्यालय, कोलकाता
३. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
४. कलकत्ता विश्वविद्यालय
५. पंजाब विश्वविद्यालय
६. उस्मानिया विश्वविद्यालय
७. आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम
८. भारतियार विश्वविद्यालय
९. केरळ विद्यापीठ
१०. सीयूएसएटी, कोचीन
शीर्षस्थ विधी संस्था
१. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळूर
२. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली
३. नाल्सर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद
४. वेस्ट बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्स, कोलकाता
५. सिम्बॉयसिस लॉ स्कूल, पुणे
आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग श्रेणी
१. आयआयटी, रुडकी
२. आयआयटी, खरगपूर
३. एनआयटी, कालिकत
४. आयआयईएसटी, शिवपूर
५. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, दिल्ली
शीर्षस्थ संशोधन संस्था
१. आयआयएससी, बंगळूर
२. आयआयटी मद्रास
३. आयआयटी दिल्ली
४. आयआयटी मुंबई
५. आयआयटी खरगपूर
शीर्षस्थ दंतवैद्यक महाविद्यालये
१. सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स, चेन्नई
२. मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस, मणिपाल
३. मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स, दिल्ली
४. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ
५. डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
मुक्त विद्यापीठ
१. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ
२. नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ, कोलकाता
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद
नवाचार श्रेणी
१. आयआयटी मुंबई.
२. आयआयटी मद्रास.
३. आयआयटी हैदराबाद.
४. आयआयएससी बंगळूर.
५. आयआयटी कानपूर.
६. आयआयटी रुडकी
७. आयआयटी दिल्ली
८. आयआयटी मंडी
९. आयआयटी खरगपूर
१०.अण्णा विद्यापीठ