The series of crimes in Beed is not over! One killed in firing by security guards of a windmill company : राज्यात बीड जिल्हा सध्या फक्त येथील गुन्हेगारी कृत्यांनीच चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून (Santosh Deshmukh Case) करण्यात आला होता. या प्रकरणाची देशात चर्चा झाली. यानंतरही जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर नुकतीच एक घटना उघडकीस आली आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरातील पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही चोरट्यांकडून पवनचक्की परिसरात चोरीचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. या चोरांवर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. या गोळीबारानंचर नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
चांगल्या झोपेसाठी तोंडावर पट्टी लावणं… बेतू शकतं जीवावर; तज्ज्ञांनी ‘या’ ट्रेंडला म्हटलंय धोकादायक
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा अगोदरच याच पवनचक्की प्रकल्पामुळे गाजत आहे. त्यात आला याच प्रकल्पामध्ये ही घटना घडली आहे. या परिसरामध्ये दोन चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. त्यावेळी या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका चोरट्याला ही गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यात रोज एका नव्याघटनेला जन्म दिला जातोय. (Beed ) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच मोठ सत्र या जिल्ह्यात पाहायला मिळतय. सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh) क्रूर हत्येने बीड (BEED)राज्यात गाजलं. राजकीय व सामाजिक दबावानंतर धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांचा खास माणूस वाल्मिक (Walmik Karad) कराडच्या मुसक्या आवळल्या गेल्या. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद व पालकमंत्रिपद गेले. नवे एसपी आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद घेतले. अजितदादांची कडक भूमिका, नव्या एसपींने गुन्हेगारांच्या टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी मकोकाचे हत्यार वापरले. त्यामुळे बीडच्या गुन्हेगारांची मस्ती जिरली, असे चित्र तयार झाले. पण परळीतील लिंबोटी येथील शिवराज दिवटे (Shivraj Divate) याला तेरा ते चौदा जणांनी जंगलात नेऊन अमानुष मारहाण करत त्याचा व्हिडिओही बनविला.