Download App

शरद पवारांची पुन्हा गुगली : राष्ट्रपती राजवट उठवण्याचं ते वाक्य म्हणे चेष्टेत

मुंबई : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटली हे मी चेष्टेत बोललो होतो, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार आज मुंबईत बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला मी इतकं महत्व द्यावं असं मला वाटत नाही. मी पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मी चेष्टेत बोललो असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं आहे.

हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांच्या रोड शोचे काही फोटो

तसेच राष्ट्रपती राजवट उठल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राष्ट्रपती शासन कोणी लावले हे सर्वांना माहित असल्याचा मिश्कील टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.

Sanjay Raut : “नेता असाच असतो मोकळा ढाकळा” अजितदादांचा व्हिडीओ शेअर करत राणेंना टोला

त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलंय. जर माझ्या सांगण्यावरुन केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट उठवत असेल तर केंद्र सरकार माझा खूप मान ठेवतंय, असंच म्हणावं लागेल, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Kasba By Election : अक्षय गोडसेंचं स्पष्टीकरण, म्हणाले माझ्याकडे धंगेकरांचा नंबर सुद्धा नाही…

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलंच वाकयुद्ध पेटल्याचं दिसून आलं. फडणीसांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

देवेंद्र फडणीसांच्या गौप्यस्फोटानंतरच पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीमुळेच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Tags

follow us