हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांच्या रोड शोचे काही फोटो

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो

हा कसबा हिंदुत्ववादी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे आहे

या रोड शोमध्ये फडणवीसांनी कसबा पेठ मतदारसंघ हिंदुत्ववादी कसा याची मांडणी केली आहे.

ही निवडणूक आता एका मतदारसंघाची असली तर ती वैचारिक झाली आहे. अठरा पगड जातीचे लोकं भाजपसोबत आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोटनिवडणुकीत विरोधकांकडून अनेक नरेटिव्ह करण्याच प्रयत्न करण्यात आला. इथला ब्राम्हण समाज नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं.

ही लढाई भाजप काँग्रेस नाहीतर रासने धंगेकर लढाई असल्याचा नरेटिव्ह केला मात्र,कोणी कितीही नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरीही तो नरेटिव्ह तयार होणार नसल्याचं ठामपणे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय.
