Download App

मोठी बातमी! अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून ट्रक खाली कोसळला

Ahmednagar Accident : पुन्हा एकदा अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Accident : पुन्हा एकदा अहमदनगर (Ahmednagar) शहरातील उड्डाण पुलावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उड्डाण पुलावरून ट्रक खाली पडला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अहमदनगर  शहरातील उड्डान पुलावर (flyover) अपघाताची मालिक सुरूच आहे. या पुलावरून आयशर टेम्पो (Eicher Tempo) थेट उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून खाली पडला असल्याची धक्कादायक घटना आज (24जुलै) दुपारी घडली आहे. माहितीनुसार, या अपघातात जीवित हानी झालेली नाही मात्र अत्यंत वर्दळीच्या रोडवर असलेल्या नगर सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे.

याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी या उड्डाणपूलावरून खाली पडले आहेत. ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चार चाकी खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचे असल्याचे अनेक वेळा निदर्शनास येऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहे.

follow us