राजकीय वनवासातही कोटींची उड्डाणे : कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा केलेल्या पंकजांच्या श्रीमंतीची राज्यात चर्चा

राजकीय वनवासातही कोटींची उड्डाणे : कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा केलेल्या पंकजांच्या श्रीमंतीची राज्यात चर्चा

बीड : पाच वर्षांपूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला अन् त्यांचा राजकीय वनवास सुरु झाला. पण या वनवासातही पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये कमालाची वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली एकूण जंगम मालमत्ता पाच कोटी 54 लाख 54 हजार 72 रुपये इतकी होती. आता त्यांची जंगम मालमत्ता सहा कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपये इतकी झाली आहे. यात 450 ग्राम सोने आणि चार किलो चांदी आहे. याशिवाय दोन लाख 30 हजारांचे इतर जडजवाहिरही त्यांच्याकडे आहेत. तर चार कोटी 45 लाख 24 हजार रुपयांची त्यांची स्थावर मालमत्ता आहे. (Pankaja Munde has given information in the affidavit that she has a total wealth of 46 crore 11 lakhs. .)

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पतीच्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे. गतवेळी चारुदत्त पालवे यांच्याकडे 14 कोटी 33 लाख 55 हजार 429 कोटींची संपत्ती होती. ती यंदा कमी होऊन 10 कोटी 38 लाख 49 हजार इतकी झाली आहे. यात त्यांच्याकडे 25 लाख 40 हजार रुपयांची एक BMW गाडीही आहे. त्यांच्या पतीकडे 25 कोटी 10 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये पुण्यात डिसेंबर 2019 मध्ये म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच घेतलेल्या 11 कोटी रुपयांच्या फ्लॅटचाही समावेश आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हा फ्लॅट आहे.

नाशिकसाठी CM शिंदेंचा आटापिटा; भुजबळांनी मात्र एकाच वाक्यात पिक्चर क्लिअर केला

पंकजा मुंडे यांच्याकडे 2 कोटी 74 लाखांचे कर्ज आहे. तर त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 24 कोटी 28 लाखांचे कर्ज आहे. पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल देवगिरी यांचेकडून 70 लाख, श्री मुंडे नामक व्यक्तीकडून 15 लाख, पंकज इव्हेस्टमेंट फर्मकडून 14 लाख, प्रज्ञा मुंडे यांच्याकडून 63 लाख 76 हजार, आर.बी.कुंकलोळ यांच्याकडून 25 लाख, यशश्री डेव्हलपर्सकडून 50 लाख कर्ज घेतले आहे. तर चारुदत्त पालवे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून एक कोटी 93 लाख, सुमन पालवे यांच्याकडून सहा कोटी 13 लाख, प्रितम मुंडे यांच्याकडून 60 लाख रुपये कर्ज स्वरुपात घेतले आहेत.

“भाजपने लढण्यास भाग पाडलं पण, ही माझी शेवटची निवडणूक”; राणेंनी दिले निवृत्तीचे संकेत

कार्यकर्त्यांकडून गोळा केले होते 11 कोटी रुपये :

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली होती. 19 कोटींची थकबाकी असल्यामुळे कारखान्यावर ही कारवाई केली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंवर झालेली ही कारवाई दूर करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परीने जवळपास 11 कोटींहून अधिक रक्कम जमा केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा करणाऱ्या पंकजा मुंडे यांचीच संपत्ती 46 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याची सध्या राज्यात चर्चा होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube