राजकीय पटलावरून बॅकफुटवर पडलेले धनंजय मुंडे आता बॅनरमधूनही गायब; बीडमध्ये चर्चा कशाची?

धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला.

राजकीय पटलावरून बॅकफुटवर पडलेले धनंजय मुंडे आता बॅनरमधूनही गायब; बीडमध्ये चर्चा कशाची?

राजकीय पटलावरून बॅकफुटवर पडलेले धनंजय मुंडे आता बॅनरमधूनही गायब; बीडमध्ये चर्चा कशाची?

Dhananjay Munde : गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे कायम चर्चेत आहेत. (Munde) मुंडे यांच्या कार्यकाळात कृषीखात्यात आर्थिक गैरव्यवहार झाला होता, असाही आरोप करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे बीड जिल्हा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असं असतानाच आता बॅनरमुळे बीडचं राजकीय वातावरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादी प्रवेशाच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याचं समोर आलं आहे. भाजपाचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा 7 ऑगस्ट रोजी बीडच्या वडवनी येथे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाला अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्थानिक नेतृत्त्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याची जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळावी यासाठी बीडमध्ये जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत. याच बॅनर्सवरून धनंजय मुंडे गायब आहेत.

कुणी राहत असलं तर कसं बाहेर काढणार?, धनंजय मुंडेंना बंगला सुटेना, भुजबळांना बंगला मिळेना..

सध्या समोर आलेल्या काही बॅनर्सवर बाबरी मुंडे यांचं नाव दिसत आहे. सोबतच अजित पवार यांचंही नाव आहे. या बॅनरवर प्रकाश सोळंके, अजित पवार यांचेही मोठे-मोठे फोटो आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांचेही वर फोटो लावलेले दिसत आहेत. यात प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र कुठंही नाही याचीच जास्त चर्चा सुरू आहे.

हे बॅनर समोर आल्यानंतर बीडच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. मध्यंतरी त्यांची प्रकृतीही बिघडली होती. त्यानंतर काही दिवस ते सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नव्हते. या सर्व घडामोडींनंतर आता धनंजय मुंडे यांचा बॅनरवर फोटो दिसत नाहीये. याचा नेमका काय अर्थ काढावा? असा सवाल बीडमध्ये केला जात आहे.

Exit mobile version