Download App

माझ्यावरील आरोपाचे कोणतेही पुरावे नाही, अनिल देशमुखांची विधानसभेत माहिती

  • Written By: Last Updated:

मुंबई: माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते एैकीव माहितीवर करण्यात आले आहेत असे उच्च न्यायालयाने जामिन देतांना निरीक्षण नोंदविले आहे. चांदीवाल आयोगामध्ये सुध्दा आरोप करणाऱ्यांनी सांगीतले की आमच्याकडे पैश्याची मागणी केली नाही आणि आमच्याकडे कोणतेही पुरावे नाही असे शपथेवर सांगीतले अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंतीम आठवडा प्रस्तावदरम्यान भाजपाच्या काही आमदारांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या आरोपाचा उल्लेख केला असता त्याला उत्तर देतांना बोलत होते.

अनिल देशमुख पुढे बोलतांना म्हणाले की, माझ्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमविर सिंग यांनी जेव्हा १०० कोटीचे आरोप केल्यानंतर लगेच माझ्यावरील आरोपाची चौकशी होवून दुध का दुध पाणि का पाणि झाले पाहिजे अशी मागणी केली होती. यातुनच राज्य सरकारच्या माध्यमातुन चौकशीसाठी निवृत्त न्या. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समीती नेमुन चौकशी करण्यात आली. तसेच ई.डी. व सि.बी.आय. ने सुध्दा जवळजवळ १८ महिने तपास केला. परंतु यातुन काहीच निघाले नाही. जामीन देतांना उच्च न्यायालयाने काय निरीक्षण नोंदविले याचे दाखले सुध्दा अनिल देशमुख यांनी सभागृहला सांगीतले. जामीन देत असतांना उच्च न्यायालयाने सांगीतले की, अनिल देशमुखांच्यावर जे आरोप झाले ते एैकीव माहितीवर झाले आहे. त्यांच्यावर आरोप करतांना कोणतेही सबळ पुरावे देण्यात आले नाही. अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करणारे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्या आरोपावर विश्वास ठेवता येणार नाही असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविल्याची माहिती अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.

माझ्यावरील आरोप करतांना १०० कोटीचे आरोप करण्यात आले. परंतु न्यायालयात आरोपत्र दाखल करतांना ते १ कोटी ७१ लाखाचे करण्यात आले. परंतु न्यायालयाने जेव्हा विचारले की याचे तरी पुरावे तुमच्याकडे आहे का तर ते सुध्दा न्यायालयात देता आले नाही. जेव्हा ते प्रकरण कोर्टात चालेले तेव्हा जे कागदपत्र सादर करण्यात आले आहे त्यावरुन अनिल देशमुख यांना कोणाताही पुरावा नसल्याने दोषी ठरावता येणार नाही असे दिसते हे निरीक्षण सुध्दा उच्च न्यायालयाने नोंदविलाच्या माहिती अनिल देशमुख यांनी विरोधी आमदारांनी उपस्थीत केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना दिली.

गुन्हा केला मग शिक्षातर होणारच, राहुल गांधींच्या शिक्षेवरून शेलारांनी काँग्रेसला डिवचले 

न्या. चांदीवाल यांच्या चौकशी दरम्यान नेमके काय घडले ते सुध्दा अनिल देशमुख यांनी विधानसभेत सविस्तर सांगतीले. ज्या परमबिर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केले त्याने चांदीवाल आयोगासमोर शपथपत्रातुन सांगीतले की, मी जे आरोप केले ते एैकीव माहितीवर केले आणि त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही. सचिन वाझे याने सुध्दा न्या. चांदीवाल यांच्या समोर शपथेवर सांगीतले की, माझ्याकडुन कोणतेही पैसे अनिल देशमुख यांनी मागीतले नाही व १०० कोटीच्या अरोपात काही तथ्थ नाही. असेही अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगीतले. मला जामीन देतांना ईडी तसेच सिबीआयच्या प्रकरणात जामीन देतांना जे निरीक्षण नोंदविले आहेत तसेच चांदीवाल आयोगाने केलेल्या चौकशीचा अहवाल जो राज्य शासनाला दिला आहे त्यात सुध्दा क्लिन चिट देण्यात आली आहे. यातुन एकच समोर येते की माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते तथ्थहीन असल्याचे समोर आले आहे असेही अनिल देशमुख यांनी भाजपाच्या आमदारांनी उपस्थीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगीतले.

Tags

follow us