Download App

Maharashtra Politics : थोरातांच्या जागी पवारांना नडणारा होणार नवीन गटनेता!

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यातीलवाद टोकाला गेला. गटनेते बाळासाहेब थोरात यांनी नाराज होऊन काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पसंती आहे.

विधिमंडळ गटनेते पदासाठी दिल्लीत झालेल्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची जवळीक पाहता, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पक्षात समन्वय पाहायला मिळेल, असं पक्षातल्या नेत्यांना वाटतं. पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.

जर पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदा वरती नीत्युक्ती झाली तर महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते. कारण पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संबंध चांगले नाहीत. जेव्हा आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध बिघडले होते. आता जर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते झाले तर राष्ट्रवादी त्यांच्या सोबत कसे जुळून घेते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Sujay Vikhe Patil : ‘विरोधकांना स्वप्न पाहुद्यात’ : विखेंचा लंकेंना टोला 

काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. पृथ्वीराज चव्हाणांमुळे 2014 साली सरकार गेल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण डायरेक्ट दिल्लीहून आल्याने त्यांना आमदारकीचाही अनुभव नव्हता. दुर्दैवाने काँग्रेस आणि आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि पुढे फटका बसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Tags

follow us