Nashik Rain Alert : भारतीय हवामान विभागाने आज (7 जुलै) नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मोठा इशारा दिला होता. एका दिवसात 350 मिलीमीटर पावसाची शक्यता हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्यासाठी वर्तवण्यात आली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain Alert) सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असून 7 जुलै रोजी ढगफुटी आणि पूराची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती मात्र आता नाशिक जिल्ह्यात ढगफुटी पावसाचे संकट टळले असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी तब्बल 450 मिलिमीटर पाऊस पडला होता आणि 7 जुलै रोजी वाऱ्याच्या प्रवाहमुळे नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता होती. मात्र आता वाऱ्याची दिशा बदलली असल्याने हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे आता नाशिकवरील ढगफुटीचा धोका आता टळला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातून वाऱ्याची दिशा बदलल्याने अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात आता मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नगरसाठी अलर्ट जारी करण्यात आले आहे.
संजू सॅमसन भारतीय संघातून बाहेर का? बीसीसीआयने दिले धक्कादायक कारण –
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये
नाशिकवर येणारा ढगफुटीचा संकट टळला असला तरी नागरिकांनी हवामानातील बदल पाहता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना केले आहे.
