Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना न्यायालयात आणले जाते. तेव्हा त्यांची बी टीम त्यांच्या कायम सोबत असते यांच्याकडून आमच्या दडपण आणि दहशत दाखविली जात असल्याचा आरोप (Santosh Deshmukh) संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपीला सोडायला गेलेले, भावाच्या पाठी जी गाडी होती तिला घरी पोहचवणारे हे आहेत असंही देशमुख म्हणालेत. धनंजय यांच्या या दाव्यामुळे आता राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बालाजी तांदळे, वर्षा गावचे सरपंच संजय केदार, फोन पे पैसे झालेले डॉ सुभाष वायबसे,मोराळे या चौघांचा समावेश या बी टीममध्ये आहे अशी थेट नावही देशमुख यांनी सांगितलीत. यांच्याकडून आम्हाला मोठा धोका आहे. संजय केदारे आणि इतर सर्व जण घटना घडल्यानंतर दहा दिवस गायब होते. आम्हाला वेळोवेळी धमक्या येत आहेत असाही आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की कोणालाही सोडले जाणार नाही. जर देशमुख यांना धमक्या येत आहेत तर त्यांनी रितसर तक्रार करावी अशी मागणी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट;विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले
बालाजी तांदळे, संजय केदार, शिवलिंग मोराळे आणि डॉक्टर संभाजी वायबसे हे चार लोक आहेत. जे वाल्मीक कराडला पोलीस ठाण्यात भेटायला जातात. तर बालाजी तांदळे हा बऱ्याचदा कराडला भेटायला गेला होता. त्याचवेळेस धनंजय देशमुख हे देखील बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांना भेटायला गेले होते. बालाजी तांदळेने मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो धनंजय देशमुखांना दाखवला होता. त्याची तक्रार देखील देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली होती. मात्र पोलीस त्यांना पकडून कारवाई का करत नाही? हा आमचा प्रश्न आहे, असे देशमुख म्हणाले.
बालाजी तांदळे याने गेवराई येथे पोलीस कोठडीत असलेले आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार आणि जयराम साठे यांना गाडी पुरवली होती तसेच पैसे देखील दिले होते. कोठडीत असताना ब्लँकेट व बिसलरी बाटल्या अशा प्रकारचे साहित्य पुरवणारी हीच टीम आहे. तरी अद्याप पोलिसांनी या लोकांना सहआरोपी का केले नाही? असा संतप्त सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.
शिवलिंग मोराळे वाल्मीक कराडला सोडण्यासाठी पुण्याच्या पाषाण येथील सीआयडी कार्यालयात घेऊन गेला होता. तर डॉक्टर संभाजी वायबसेने आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली होती, त्याचबरोबर फरार असल्याच्या काळामध्ये आर्थिक मदत देखील पुरवल्याचे समोर आले होते. डॉक्टर संभाजी वायबसे याला चौकशीसाठी सीआयडीने ताब्यात देखील घेतले होते. संजय केदार आणि वाल्मीक कराडचे काही शासकीय कामांमध्ये लागेबांधे आहेत. तरी देखील पोलीस यांना सहआरोपी करत नाही असा देखील आरोप देशमुख यांनी केला आहे. या सर्वांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.