माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये… अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

मी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या

माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये... अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये... अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

Akola Talathi Suicide : एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या मानसिक छळाला कंटाळून (Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिलानंद तेलगोटे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा अंक कायम; परळी तालुक्यात एकजणाचा दगडाने ठेचून खून, प्रकरण काय?

माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये असं तेलगोटे म्हणाले होते. पोलिसांनी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल. पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केलं होतं. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे. तेलगोटे यांच्या व्हॉटसॲपवर स्टेटसवरून आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे.

व्हॉट्सअप’वर स्टेटस नेमकं काय ?

मी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी लोण म्हणून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टेम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल… कारण माझी पत्नी… असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version