बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा अंक कायम; परळी तालुक्यात एकजणाचा दगडाने ठेचून खून, प्रकरण काय?

Beed Crime : बीड जिल्ह्यात रोज एका नव्याघटनेला जन्म दिला जातोय. (Beed ) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच मोठ सत्र या जिल्ह्यात पाहायला मिळतय. मशिदीजळ बॉम्ब फोडण्याची घटना ताजी असतानाच आता दुसरी एक हादरा देणारी घटना समोर आली आहे. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भावाने आणि त्याच्या पत्नीने एकाचा दगडाने ठेचून खून केला.
परळी तालुक्यातल्या सिरसाळाजवळील कान्हापूर येथील ही घटना आहे. मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख या व्यक्तीने आत्महत्या केली होती. स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून अविनाशने जीव गमावला होता. या घटनेनंतर स्वप्नील देशमुखवर गुन्हा दाखळ झाला होता. हा गुन्हा मागं घेण्यासाठी तो अविशाश देशमुखच्या कुटुंवियांवर दबाव आणत होता.
बीड पुन्हा हादरले! मध्यरात्री अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट; दोघजण ताब्यात, काय आहे प्रकरण?
शेवटी स्वप्नील काही त्रास देण्याचं थांबत नव्हता. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर धनंजय देशमुख आणि भावजय सोनाली देशमुख यांनी स्वप्नीलचा गळा चिरून आणि दगडाने ठेचून त्याचा जीव घेतला. तसंच, ज्या झाडाला अविनाशने गळफास घेतला होता, त्याच झाडाखाली दोघांनी मिळून स्वप्नीनला संपवलं.
ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा काय वातावरण आहे अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, या घटनेनंतर धनंजय आणि सोनाली हे स्वत: सिरसाळा पोलीस ठाण्यात हजर झाले. दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील कारवाई सिरसाळा पोलीस करत आहेत.