Download App

Video: काही लोकांच्या ब्लॅकमेलला कंटाळून कंपनी मालकाची आत्महत्या, यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट

सध्या केंद्र सराकरने नवीनच सुरूवात केली आहे. सोयाबीन आयात केलं. कापूर आयात केलं. यामुळे शेतीमालाचे भाव पाडतात.

  • Written By: Last Updated:

Yashomati Thakur Exclusive : विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरू झालाय. (Yashomati Thakur) सध्या प्रचाराला चांगला वेग आलाय. अशा वातावरणात तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी  लेट्सअप मराठीवर अनेक विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या.  त्यामध्ये त्यांनी मतदारसंघातील विकासासह शेतीमालाच्या भावावर भाष्य केलं आहे.

यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज भरताना सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो सोयाबीन दराबदद्लचा. त्यावर प्रश्न विचारला असता यशोमती ठाकूर म्हणाल्या आपण या दरांचा विचार केला तर याचा सर्व भाव ठरतो तो केंद्रीय पातळीवर. मोदी सरकारने याकडे काय कधी लक्ष दिलेलं नाही. परंतु, आम्ही विधानसभेत याचा मुद्दा कायम उठवला आहे. तसंच, रस्त्यावरही सोयाबीनचा मुद्दा घेऊन आम्ही आवाज उठवला आहे.

यशोमती ठाकूर यांची ताकद वाढली, भाजपच्या नरेंद्र राऊतांसह शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

सध्या केंद्र सराकरने नवीनच सुरूवात केली आहे. सोयाबीन आयात केलं. कापूर आयात केलं. यामुळे शेतीमालाचे भाव पाडतात. केंद्र सरकार असं का करत आहे? अशा धोरणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत. तर, व्यापाऱ्यांच भलं होतं. मोदी सरकार हे मोदी सरकारचं भलं करणारे आहे असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तंसच, आम्ही मात्र, सत्ता आल्यावर हे काही चालू देणार नाहीत असंही त्या म्हणाल्या आहेत.

नांदगाव कंपनी माझ्या मतदारसंघात येते. नांदगाव कंपनीची अवस्था तुम्ही लोकांना विचारून घ्या. विदर्भात कशा कंपनी येतील. त्या कशा विकसीत होतील हे धोरण आम्ही राबलं. परंतु, कंपनी आणण्यासाठी आमचे कायम प्रयत्न राहिले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात एका कंपनीसाठी एमयु झालं होतं. परंतु, जो कंपनी आणत आहे त्या व्यक्तीला काही लोकांनी इतका त्रास दिला की त्याने आत्महत्या केली असा खुलासाही यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला. तसंच, जनता या सगळ्या गोष्टी पाहत असते असंही त्या यावेळी म्हणाल्या.

 

follow us