Niti Aayog Meeting: 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार

Niti Aayog Meeting: 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार

Niti Aayog Meeting: नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला असतानाच आज नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातला. गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी या अध्यक्षतेखाली झाली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संपन्न झाली. या बैठकीची थीम ‘विकसित भारत @2047: रोल ऑफ टीम इंडिया’ आहे.

बहिष्कार घातलेल्या आठ मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, बिहारचे नितीश कुमार, तेलंगणाचे के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, राजस्थानचे अशोक गेहलोत आणि केरळचे पिनाराई विजयन यांचा समावेश आहे. त्याचवेळी दिल्लीचे अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे भगवंत मान यांनीही थेट बहिष्कार टाकला आहे.

समान नागरी कायद्याबाबत रावसाहेब दानवेंच मोठं वक्तव्य, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षातील केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद येणाऱ्या काळात आणखी तीव्र होऊ शकतो. केंद्रातील सत्ताधारी भाजपने नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. भाजपने सर्व मुख्यमंत्र्यांचा निर्णय ‘जनताविरोधी’ आणि ‘बेजबाबदार’ असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेतही भारतीय सणांचा डंका; खासदाराने केली थेट राष्ट्रीय सुट्टीची मागणी

नीती आयोग गव्हर्निंग कौन्सिलची ही बैठक शनिवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू झाली. यामध्ये 2047 पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याच्या उद्देशाने आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube