यशोमती ठाकूर यांची ताकद वाढली, भाजपच्या नरेंद्र राऊतांसह शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

नरेंद्र राऊत (Narendra Raut) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला

  • Written By: Published:
Yashomati Thakur

अमरावती : भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण आणि तिवसा तालुक्यातील गटबाजीला कंटाळून भारतीय जनता पार्टीचे (BJP) ज्येष्ठ नेते तथा जिल्हा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नरेंद्र राऊत (Narendra Raut) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलेल्या नोटीसवर टिंगरेंची सही, पवारांसह कॉंग्रेस, सेनेलाही कोर्टात ओढलं… 

नरेंद्र राऊत यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राऊत यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांना पाठिंबा दिल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले.

मतांचे ऋण शहराच्या सर्वांगीण विकासाने मी फेडणार ; भव्य शक्तिप्रदर्शन करत संग्राम जगताप यांचं प्रतिपादन 

नरेंद्र राऊत हे भाजपाच्या जिल्हा किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष असून त्यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. तिवसा मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या नवीन उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे नरेंद्र राऊत नाराज झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता गटबाजीचे राजकारण होत असल्याने तिवसा मतदार संघात प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा नेतृत्वाने देखील याची दखल घेतली नाही. जुन्या जाणत्या निष्ठावंत लोकांना डावलून भाजप आपल्या आडमुठी धोरणावर ठाम आहे. शेतीमालाला भाव नाही, कार्यकर्त्यांना वाव नाही, त्यामुळे आपण शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे नरेंद्र राऊत यांनी सांगितले. तर मलिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तिवसा तालुक्यातील भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे. गुरुकुल मोझरी येथे झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र राऊत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतल्यामुळे काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण आहे.

follow us