एसआयआर फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस; महाराष्ट्रात बंगाल पॅटर्न वापरण्याचा कट रोहित पवारांचा आरोप

last day to fill out SIR form SIR फॉर्म भरण्याची आज अंतिम तारीख आहे.

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Accident Death Inquary

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Accident Death Inquary

Today is last day to fill out SIR form Rohit Pawar alleges on BJP Government : SIR फॉर्म भरण्याची आज अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना आणखी मुदत मिळावी, ही प्रमुख मागणी ते आयोगासमोर मांडणार आहेत.

खाकीची शान! एमआयडीसीचे हेमंत थोरात व राजू सुद्रिक यांना मानाचे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान

महाराष्ट्रात सध्या कोणतीही निवडणूक जवळ आलेली नसताना SIR प्रक्रिया एवढ्या वेगाने का राबवली जात आहे, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. मतदारांची नावे वगळून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

रविवारी आलात….आतापर्यंत तुम्ही फक्त गोट्या खेळल्यात का ? रोहित पवारांचे उद्योगमंत्री सामंतांना प्रत्युत्तर

पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने मतदारांच्या नावांबाबत प्रक्रिया राबवण्यात आली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ‘बंगाल पॅटर्न’ लागू करून सत्तेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

बॉम्बे हायकोर्ट लिपीक परीक्षा गोंधळात; ‘हेच जंतर-मंतर’ म्हणत दीपके आंदोलनात

सरकारच्या पाठबळावर असा कोणताही कट यशस्वी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नागरिकांना SIR ची प्रपत्रे व्यवस्थित भरून जमा करता यावीत, यासाठी निवडणूक आयोगाने अंतिम मुदत वाढवावी, अशी मागणी रोहित पवार आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे करणार आहेत.

 

Exit mobile version