Download App

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, आज 32 वा दिवस

  • Written By: Last Updated:

मुंबई : मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन व्हावे या मागमीसाठी चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज ३२ वा दिवस आहे.

कर्नाटक राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन केले आहे तसे महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे यासाठी गेली ३२ दिवसांपासून धरणे साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत.

आजही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. विद्यार्थ्यांची विनंती आहे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करावी व कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

Kasba Chinchwad Bypoll : संजय राऊतांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, हा तर त्यांचा प्रशासनावर.. 

मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिसा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय येथे मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखा व स्थापत्य अभियांत्रिकी शाखा समतुल्य आहेत तर मग महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी पदवी असतानाही मृदा व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र का केले जात नाही? कृषी अभियंत्यांना संधी का दिली जात नाही? कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी ही मागणी सरकारकडे कृषी अभियंते करत आहेत तरी सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही. सरकारने लवकरात लवकर कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

Tags

follow us