Trupti Desai : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तृप्ती देसाईंनी मुंडे यांना इशारा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर विखारी टीका टिप्पणी करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना रोखले नाही तर मी स्वतः परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवेन, असा इशारा त्यांनी दिला.
मोठी बातमी! कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलतांना तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेव्हापासून तृप्ती देसाईंना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या तृप्ती देसाई परळीत येऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कार्यकर्त्यांना रोखा, अन्यथा परळीत येऊन बसेन
धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी. मी अजून फार काही बोलले नाही. पण सातत्याने खालच्या पातळीवर ट्रोलिंग कऱण्यात आली तर मी परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवेन, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
कराडचा दिंडोरीच्या आश्रमात आश्रय
उल्लेखनीय बाब म्हणजे, तृप्ती देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी वाल्मिकी कराडने फरार असताना १५ आणि १६ डिसेंबर रोजी दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात वास्तव्य केल्याचा आरोप केला होता. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे १५ आणि १६ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील एका आश्रमात मुक्कामाला होते. त्याचवेळी, खंडणी प्रकणात पोलिस त्यांचा शोध घेत होते. ते तिथे दोन दिवस राहिले. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी पुढच्या प्रवासाला निघून गेले.
Saiee Manjrekar : सईचा स्टायलिश लूक, लेदर जॅकेटमधील फोटो व्हायरल
गेल्या वर्षी या आश्रमात काही चुकीचे प्रकार घडले होते. त्याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत अण्णासाहेबांचे पुत्र चंद्रकांत मोरे देखील उपस्थित होते. त्यावेळी वाल्मिकी कराडने मध्यस्थी केली होती. त्याचे हे उपकार फेडण्यासाठी त्याला या या आश्रमात आश्रय देण्यात आला असावा, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्यानंतर आता तृप्ती देसाईंनी देखील धनंजय मुंडेंविरोधात मोर्चा उघडल्याने मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत होत आहे.