Pakistan Flag in Solapur : सोलापुरातून आज बकरीच्या दिवशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील होटगी रस्त्यावरी शाही आलमगीर इदगाह मैदानाजवळ, पाकिस्तानचा झेंडा आणि लव्ह पाकिस्तान असं लिहिलेले फुगे विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या ठिकाणी बकरीच्या निमित्ताने आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या फुगे विक्रीत्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. (try for selling Pakistan flag and love Pakistan balloons on Bakari Eid in Solapur )
Narendra Modi : लोकसभेसाठी भाजपची ‘थ्री सेक्टर’ रणनीती; स्वतः मोदींनी सांगितलं प्लॅनिंग
पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हे फुगे कुठून आणले? या संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. हे फुगे बाजारात कसे आले? कोणी आणले? आणि या फुग्यांची होलसेल विक्री ज्यांनी केली या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करा. असं निवेदन एमआयएमचे वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष रियाज सय्यद यांनी पोलिसांना दिलं.
अजय पवार असं फुगे विक्रेत्याचं नाव आहे. तो शहरातील विजापूर रोडवरीूल पारधी वस्तीत राहतो. त्याला या फुग्यांबद्दल विचारले असता त्याला सांगता आले नाही. तसेच हे फुगे विकणारे लेक गरिब असतात मात्र त्यांना पुढे करून काही लोक हे विघातक कृत्ये करतात. अशी टीका करण्यात येत आहे. दरम्यान आज देशभरात सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे. तर दुसरीकडे राज्यात आषाढी एकादशी देखील उत्साहात साजरी होत आहे. मात्र या दरम्यान होणारे हे असे समाज विघातक प्रकार पाहता. यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच सणउत्सवाला गालबोट देखील लागते.