Co-operative Societies : मोठा बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतरच होणार सहकारमंत्री अतुल सावेंचा निर्णय
Co-operative Societies Elections : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत त्यामध्ये 30 जूननंतर या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र आता त्या संदर्भात राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 30 जूननंतर होणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर होणार आहेत. (Maharashtra Cooperative Societies Elections Extend elections will held after 30 September )
Alia Bhatt: मुलाखतीमध्ये आलियाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘घरी जा घरी’
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता त्याचबरोबर शेतकरी देखील पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकरीच या निवडणुकांमध्ये मोठी भूमिका पार पाडणार असून ते या मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
राज्यात 82,631 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र पावसाळ्यामुळे या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांच्या निवडणूका होणार आहेत. या संस्था वगळता ज्या संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत. तेथेच थांबणार आहेत. असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान राज्यातील 82,631 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये 49,333 सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर 42,157 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रकिया पूर्ण झाल्या आहेत. तर 6,510 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निर्णयामुळे हजारो सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना दिलासा मिळाला आहे.