Ahilyanagar News : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आनंदी अनिल कांडेकर (वय 4) आणि वीरा प्रवीण कांडेकर (वय3) या दोन चिमुकल्या शेततळ्यात पडल्या. मात्र, उपचारासाठी दौंड येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला.
नेमक काय घडलं ?
या बाबत अधिक माहिती अशी, कांडेकर या शेतकरी कुटुंबातील आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर या दोन लहान मुली या खेळत होत्या व खेळता खेळता त्या शेतात असलेल्या शेततळ्यात पडल्या. ही बाब लक्षात येताच स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेऊन दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले. दोघींना तातडीने बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत तातडीने रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. मात्र, वैद्यकीय अधिकारी प्रशांत मुळे यांनी रुग्णवाहिका पाठवण्यास असमर्थता दर्शवली. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे दोन्ही चिमुकल्यांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
सरकारवर प्रचंड दबाव म्हणूनच… ; कॉक्रोज जनता पार्टीचा मोठा दावा
नागरिकांचा संताप आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले
संतप्त झालेल्या ग्रामस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप लावत आरोग्य अधिकारी मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्यासाठी दारातच आंदोलन सुरू केले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे व तालुका आरोग्य शैला डांगे यांनाही आंदलोनकर्त्यांनी आरोग्य केंद्रात डांबून ठेवले. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करीत संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
