Sanjay Jadhav On Maratha Reservation : मराठा समाजाला अद्याप आरक्षण (Maratha reservation) मिळालं नाही. प्रत्येक समाजाने आपल्या पदरात आरक्षण पाडून घेतलं. आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही आरक्षण मिळण्याचा प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला. यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्यावर न होता, जातीच्या आधारावर झाली. मराठा (Maratha) विरुध्द ओबीसी अशी ही निवडणूक झाली. याला भाजप जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणं भोवलं! दोन डॉक्टर अन् शिपायाचं निलंबन…
संजय जाधव यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणावरून त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं समर्थन केलं. ते म्हणाले, आजपर्यंत ओबीसींसाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी लढा दिला आहे. सगळ्या समाजांनी रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव आणला आणि काही मागण्या मान्य केल्या. आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही तसाच प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल जाधव यांनी केला.
Pune Accident मध्ये आमदाराचा मुलगा ते तावरेंच्या जीवाला धोका; पटोलेंचे धक्कादायक खुलासे
पुढं बोलतांना ते म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या समाजासाठी काही गोष्टी मान्य करून घेण्याचा नैतिक अधिकार आहे. काही गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या असतील तर रस्त्यावर उतरावचं लागेल. आरक्षणसारखी गोष्ट मिळण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला तर तो दोषी का? मराठ्यांनी ओबीसीतून किंवा सगेसोयऱ्यांचे आरक्षण मागणे चुकीचे आहे का? असा सवाल त्यांनी केला.
मराठ्यांचे चूल पेटवायचे वांदे
तुमचा डीएनए ओबीसींचा आहे म्हणून तुम्ही आरक्षणाची मागणी मान्य करत नाही का? असा थेट सवाल जाधव यांनी राज्यातील महायुती सरकारला विचारला. मराठा समाजात आज चूल पेटायचे वांदे आहेत, असंही जाधव म्हणाले.
आर्थिक निकषांवर आरक्षण द्या…
बाळासाहेब ठाकरे यांनी जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर द्या, अशी मागणी केली होती. आज तीच परिस्थिती आहे. आम्ही कुणाचं हिसकावून मागत नाही. मात्र मराठा समाजातील गरजूंना आरक्षणाची गरज आहे. त्यांच्या हक्कासाठी आम्ही आरक्षणाची मागणी करतोय, असंही जाधव म्हणाले.
ही पहिली निवडणूक अशी होती की, जी विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली नाही. ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढली गेली. जातीच्या वळणावर ही निवडणूक गेली. निवडणूक प्रचार संपल्यावर हेवेदावे संपायला हवे होते. निवडणुकीमुळं कटुता टोकाला जायला नको होता. निवडणूक जातीवर गेली. भाजपचे नेते जे संवैधानिका पदावर आहेत, त्यांच्यामुळं हे झालं. देशाचे पंतप्रधान म्हणतात की मी ओबीसीमधून आलो आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे, त्यामुळं हे झाल्याचं जाधव म्हणाले.