संजय जाधवांची तीन कोटींची सुपारी; हेमंत पाटलांचा अजब सल्ला
परभणी : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. खासदार जाधव यांनी जिल्हाधिकारी(District Collector), पोलीस अधीक्षकांसह (Superintendent of Police)थेट गृहमंत्र्यांकडे (Home Minister) याची तक्रार केली आहे. त्यानंतर राजकीय (Political)वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांना दोन वर्षांपूर्वी नांदेडमधील (Nanded)रिंधा टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदार जाधवांनी आपल्याला दुसऱ्यांदा धमकी आल्याचं म्हटलं आहे. या गोष्टीचा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil)यांनी निषेध केला आहे. त्याचवेळी खासदार पाटील म्हणाले की, आपण असं काम करु नये की, कोणी आपल्या जीवावर उठेल, खासदार पाटलांच्या अशा सल्ल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खासदार हेमंत पाटील म्हणाले की, खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी तीन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. यापुर्वीही रिंधा प्रकरणामध्ये ते नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना भेटले होते.
Sushma Andhare : राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे हा नरेंद्र मोदींचा पराभव
तेव्हा आमची त्यावर चर्चा झाली होती, त्यामुळे जीवे मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रकार गंभीर आहे. याविषयी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार असल्याचेही एका वृत्तवाहिनीला खासदार पाटलांनी सांगितले.
खासदार पाटील म्हणाले की, आपणही कोणी आपल्या जीवावर उठेल असे काम करु नये, असा सल्ला त्यांनी यावेळी खासदार जाधवांना दिला आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह गृहमंत्र्यांकडेही केली आहे.
दोन दिवसांपूर्वी फोनवरुन आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळाली होती. फोन करणाऱ्याने आपल्याला जीवे मारण्यासाठी तीन कोटींची सुपारी दिल्याचे सांगितले होते. जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्यानंतर एकच एकच खळबळ उडाली होती. त्यातच हिंगोलीच्या खासदारांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर ते म्हणाले की, काही माणसं आपल्या जीवावर उठतात, ते काम करत असताना कोणी आपल्या जीवावर उठेल असे काम करु नये, आपण समाजाचे नेतृत्व करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चाललो तर मला नाही असं वाटत की, कोणी अशा थराला जाईल. खासदार पाटलांच्या अशा प्रकारच्या सल्ल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.