Download App

कुणाल कामराला दहशतवादी संघटनाकडून पैसे, उदय सामंतांनी केली मोठी मागणी

Uday Samant criticizes opponents over Kunal Kamra : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं आहे. वाघ्या कुत्र्याचं स्मारक, औरंगजेबाची कबर त्यातच व्हायरल झालेला कुणाल कामराचा (Kunal Kamra) व्हिडिओ. या मु्द्द्यांमुळे अधिवेशन देखील वादळी ठरलं. दरम्यान आता कुणाल कामरावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी विरोधकांवर खळबळजनक आरोप केलाय.

मागील तीन वर्षापासून विरोधक वाटेल त्या भाषेत टीका करत (Maharashtra Politics) आहे. परंतु त्यामुळे लोकांमध्ये शिंदे साहेबांबद्दल आत्मियता आणखी वाढतच आहे. कुणाल कामरावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्याला दहशतवादी संघटनाकडून पैसे दिले जात असतील, यात तथ्य असू शकते. त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे. कुणाल कामराने मुंबईत येवून टीका करावी. तर कामराचं समर्थन करणाऱ्यांमध्ये महाविकृती आहे, असा खोचक टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे.

कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ; शंभूराज देसाई संतप्त

उदय सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. फडणवीस आणि शिंदेंमध्ये विस्तव टाकण्याचा प्रस्ताव केलाय. त्यांची दोस्ती पक्की आहे. ठाकरे बालिशपणा करीत असल्याची टीका सामंत यांनी केलीय. शिवसेना कोणाची हे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलं असल्याचं देखील सामंतांनी म्हटलं आहे. आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. ते फक्त 20 जिंकले. त्यांच्या हाती काही राहिलं नाही, ते आता कॉंग्रेसच्या तालावर नाचत आहे. कॉंग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब बरोबर गद्दारी केली असल्याची टीका सामंतांनी ठाकरेंवर केलीय.

पंतप्रधान मोदी सौगात उपक्रम सुरू करत आहे. त्यांनी जे फेक नरेटिव्ह सेट केलं होतं, युतीविरूद्ध ते संपतील का? ही भीती त्यांना आहे. आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही. त्यांनी कंगनाच्या घरावर बुलडोझर पाठवला. राणे साहेबांना अटक करायला पोलीस पाठवले, त्यांनी केलेलं कृत्य पुसलं जाणार नाही, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय.

वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची? भूषणसिंह राजे होळकरांचा रोख कोणाकडे?

अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झालीय. हा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणामध्ये अटकवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. नुसतं विधानभवनात येवून पत्रकार परिषद घ्यायची. त्यांनी आधी पूर्ण काम समजून घेणं गरजेचं आहे, असं देखील सामंत यांनी म्हटलंय.

युतीमध्ये कोणी पदासाठी बंडात नाही . यांच्या डोक्यात सत्ता असून त्यांनी कितीही भांडणं लावायचं काम केलं, तरी होणार नाही असं देखील सामंत यांनी स्पष्ट केलंय. भास्कर जाधव सीनियर लीडर आहे. ते नाराज झाले, तर अडचण होऊ शकते. हे पत्र देवून विरोधकांनी भास्करराव जाधव यांना फसवलं आहे, अशी देखील टीका त्यांनी केलीय. दिशा प्रकरणी बोलताना सामंत म्हणाले की, तिच्या वडिलांनी कोर्टामध्ये अर्ज केलाय. विषय कोर्टामध्ये आहे. त्यामुळे न्यायालय जो सरकारला निर्णय देईल, त्याचे पालन केले जाईल.

follow us