Download App

‘फटके बसले असतील, म्हणून…’ राऊतांच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray Group Will Contest will Individually Corporation Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आम्ही बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढू. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सर्व ठिकाणी पालिका निवडणुका आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. राजकीय वर्तुळात राऊतांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. यावर आता शिंदे सेनेची (Uday Samant) पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

Video : मुलीची राजकारणात एन्ट्री ते घरातील शेवटचा राजकारणी कोण?; फडणवीसांच्या उत्तराने नवी चर्चा

उद्धव ठाकरे यांनी पुढील पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाची (Maharashtra Politics) पहिली प्रक्रिया समोर आलीय. यासंदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (BMC Election) म्हणाले की, त्यांच्यात काय चाललंय, जसं तुम्हाला कळत नाही. तसंच महाराष्ट्राच्या मतदाराला देखील कळत नाहीये.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हा निर्णय का घेतला असावा? यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, 2019 ला जनमताचा कौल असताना देखील कॉंग्रेससोबत जावून पंजाचा प्रचार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, भविष्यामध्ये शिवसेनेकडून कॉंग्रेसचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. तसेच भाषणामध्ये हिंदूहृदयसम्राट शब्द न वापरणे, अशा अनेक कारणांमुळे फटके बसले असतील, यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असेल असं देखील उदय सामंत म्हणालेत.

मी पंतप्रधान मोदींना माणूस मानत नसून ते भगवान श्रीकृष्णाचे…संजय राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर टोला

उदय सामंत म्हणाले की, ठाकरे गट योग्य वळणावर येत आहे का हे त्यांनाच माहित. कदाचित त्यांना काही गोष्टींची जाणीव झाली असेल. म्हणून कदाचित महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील. तरी 15 वर्ष आम्हाला चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. पक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असल्यास त्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. अन्यथा ते राजकारणात कसे टिकणार, असा सवाल देखील सामंतांनी केलाय.

एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे की, सर्वसामान्यांचा नेता जनतेत गेल्यास यश मिळवू शकतो. ठाकरेंच्या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात असुरक्षितता दिसत असल्याचं देखील सामंतांनी स्पष्ट केलंय.

 

follow us