…तर दोन महिन्यांतच आमचं मंत्रिपद जाणार; नाराज नेत्यांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया

एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसंच, जे मंत्री झालेत

...तर दोन महिन्यांतच आमचं मंत्रिपद जाणार; नाराज नेत्यांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया

...तर दोन महिन्यांतच आमचं मंत्रिपद जाणार; नाराज नेत्यांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया

Uday Samant on Cabinet : मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी उघड केली आहे. सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत व छगन भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत. (Uday Samant ) त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या कृतीतून त्यांची नाराजी प्रकट केली आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे ५७ आमदार आहेत आणि ११, १२ मंत्रिपदं आम्हाला मिळाली आहेत. अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो.

मी काय खेळणं आहे का तुमच्या हातातलं?; खडेबोल सुनावतं नाराज भुजबळ कडाडले…

एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसंच, जे मंत्री झालेत त्यांच्यामध्ये कोणाची काही नाराजी असेल तर ती देखील दूर करणं आवश्यक आहे. आम्ही शिवसेना म्हणून विस्ताराने त्यावर काम करत आहोत. शिवसेनेत यावर चर्चा होत आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे ही शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी आहे. दोघेही मंत्री होते, त्यांना लवकरात लवकर आमचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री बोलावून घेतील आणि त्यांची समजूत काढतील. परंतु, तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात आहे ते या दोघांच्या मनात नसेल, याची मी सर्वांना खात्री देतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

…तर दोन तीन महिन्यांत मंत्रिपद जाईल

मी चांगलं काम केलं नाही तर अडीच वर्षानंतर माझ्या जागी दुसऱ्या नेत्याला मंत्री केलं जाईल असं सांगितलं जात आहे. परंतु, अडीच वर्षे कशाला, मी जर चांगलं काम करत नसेल तर दोन-तीन महिन्यांत देखील माझं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं. दोन-तीन महिन्यात चांगलं काम केलं नाही तर आमचे नेते आमचं मंत्रिपद काढून घेऊ शकतात, याची आमच्या मनात भीती आहे. त्यामुळे आम्हाला जनतेला अभिप्रेत असं काम करावं लागेल. सर्व नेत्यांना आमदारांना बरोबर घेऊन काम करावं लागेल. महायुतीला न्याय द्यावा लागेल असंही ते म्हणाले आहेत.

Exit mobile version