Uddhav Thackeray, : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, ) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना (Sunil Tatakare) देखील धारेवर धरले. ते म्हणाले की, भाजपने जसा माझ्या घराणेशाहीला विरोध केला. तसा विरोध तटकरेंच्या घराणे शाहीला मोदींनी करून दाखवावा. असं आव्हाण ठाकरे यांनी दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जर घराणेशाहीबद्दल भाजपला एवढा तिटकारा असेल, तर इकडे डबल गद्दारी करणारे रायगडचे खासदाराची मुलगी आमदार, मुलगा आमदार सगळं घराणं राजकारणात असलेले तुम्हाला चालतं. ही घराणेशाही तुम्हाला चालत नाही. हे तुम्ही आज जाहीर करा. बघा ते घराणं तुमच्यासोबत राहतं का?
अजितदादांच्या आणखी एका आमदाराविरोधात पवारांची फिल्डिंग : जयंत पाटलांकडून उमेदवारीही घोषित
कठीण काळामध्ये तुमच्या सोबत राहणाऱ्या मित्रांना घराणेशाही म्हणून तुम्ही दूर करता. मात्र ही गद्दारांची घराणेशाही त्यांची पिलावळ ही तुम्हाला चालतात का तुमची पालखी वाहतात म्हणून? पण आम्ही ज्ञानोबांची पालखी वाहू, तुकोबांची पालखी वाहू, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहू, पण भाजपची पालखी होणार नाही. आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही.
पेण, रोहा, चौल…काय मिळाला रायगडकरांचा कौल? आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचलं
त्यामुळे जसा माझ्या घराणेशाहीला विरोध करतात असा तटकरेंच्या घराणे शाहीला मोदींनी विरोध करून दाखवावा. आधी मोदी यांनी राष्ट्रवादीच्या विविध घोटाळ्यांवर आरोप केले आणि आठ दिवसांमध्ये हा गट त्यांच्यात सामील झाला. ही मोदी गॅरंटी आहे का? त्यामुळे तुम्ही किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या छोट्या आरोप झालेले नसले पाहिजे. तुम्ही कोट्यावधींची घोटाळे करणारे असले पाहिजे. मग तुम्हाला उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री केलं जातं. असा आरोप ठाकरे यांनी भाजपवर केला. त्यामुळे हा सगळा खेकड्यांचा भेकड्यांचा आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकांचा पक्ष आहे. केल्यावेळी मोदींना पंतप्रधान करा म्हणून मीच आलो होतो. मात्र आता मी आलोय ते हुकूमशाही नको म्हणून. अशी टीका ठाकरे यांनी केली.