अजितदादांच्या आणखी एका आमदाराविरोधात पवारांची फिल्डिंग : जयंत पाटलांकडून उमेदवारीही घोषित

अजितदादांच्या आणखी एका आमदाराविरोधात पवारांची फिल्डिंग : जयंत पाटलांकडून उमेदवारीही घोषित

चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार यांनी चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासाठी पर्याय शोधला आहे. (Prashant Yadav, Congress taluk president of Chiplun, joined the NCP (Sharad Pawar) party.)

गत काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपमधील माजी आमदार, भाजपमधील डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी. एस. पाटील, शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा-गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले आहे.

“शेलारजी, हा तुमचा व्यक्तिद्वेष की पक्षसंस्कृती?” उद्धव ठाकरेंवरील टीकेला रोहित पवारांनी दिलं उत्तर

अशात आता प्रशांत यादव यांच्या रुपाने शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या शेखर निकम यांच्यासाठीही पर्याय शोधला असल्याचे दिसून येत आहे. यादव यांच्या पक्षप्रवेशामुळे आमदार निकम यांनाही आगामी निवडणुकीसाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण यादव यांचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यांनी चिपळूण तालुक्यासह जिल्हाभरात वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम दिले आहे. सहकार आणि दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील घराघरात ओळख मिळविली आहे. त्यामुळेच यादव हे निकम यांना सक्षम पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

रघुराम राजन यांचा सात वर्षांनी होकार? महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यासाठी ‘मविआ’त खलबत

काँग्रेसने डावलले, पवारांनी स्वीकारले :

प्रशांत यादव मागील काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पक्षकार्याची आणि राजकीय तयारीची दखल घेत काँग्रेसने त्यांना तालुकाध्यक्षपद दिले. तिथे त्यांनी उल्लेखनीय काम केल्यानंतर ते रत्नागिरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने त्यांना जिल्हाध्यक्षपदावर संधी दिली नाही. त्यानंतर त्यांनी दोनवेळा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र तो नामंजूर करण्यात आला होता. त्यामुळेच ते राष्ट्रवादीमध्ये जातील अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हाती घड्याळ बांधले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube