“शेलारजी, हा तुमचा व्यक्तिद्वेष की पक्षसंस्कृती?” उद्धव ठाकरेंवरील टीकेला रोहित पवारांनी दिलं उत्तर

“शेलारजी, हा तुमचा व्यक्तिद्वेष की पक्षसंस्कृती?” उद्धव ठाकरेंवरील टीकेला रोहित पवारांनी दिलं उत्तर

Rohit Pawar Replies Ashsh Shelar : मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर सध्या नेटकरी चांगलेच भडकले आहेत. शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना बिल्किस बानोचा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेवर मात्र लोकांनी संताप करत त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे निषेध! आशिष शेलारजी काही मोजक्या अभ्यासू नेत्यांपैकी आपल्याकडं पाहिलं जातं. परंतु, तरीही अत्याचार झालेल्या एका स्त्रीला तुमच्यासारखा वकील आणि मोठा नेता धर्माचं लेबल लावत असेल तर हा तुमच व्यक्तिद्वेष आहे की पक्षाची संस्कृती? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Aashish Shelar : वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन गावभर नाचतात? शेलारांचं टीकास्त्र

काय म्हणाले होते आशिष शेलार ?

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली होती. शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, अखेर श्रीमान उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच..! रायगड्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच..!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकावितच दौरा करणार..! आता रायगडमध्येच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का याचाही एकदा चौकशी करून बघून या!!

त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला होता. लोकांनी तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर राजकारणातही याचे पडसाद उमटले. आज रोहित पवार यांनी ट्विट करत आशिष शेलार यांच्यावर टीका केला. आता त्यांच्या या टीकेवर भाजप नेते आशिष शेलार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रोहित पवार यांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube