Udhav Thackery : नवनवीन जॅकेट शिवले तेही जुने झाले पण मंत्रिपद काही मिळत नाही; ठाकरेंचा गोगावलेंना टोला

Udhav Thackery : नवनवीन जॅकेट शिवले तेही जुने झाले पण मंत्रिपद काही मिळत नाही; ठाकरेंचा गोगावलेंना टोला

Udhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhav Thackery) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘स्वप्नातले पालकमंत्री, मंत्री पदासाठी नवनवीन जॅकेट शिवली ती देखील जुनी झाली. नव-नवीन नॅपकीन घेतले ते देखील घामाने भिजले. पण मंत्रीपद काही मिळत नाही.’

‘आधीच सांगितलं होतं, सरकार आरक्षण देणार नाही’; राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्टच सांगितलं

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तानाजी मालुसरे या वीराच्या भूमीमध्ये झेंडा बाजूला. पण नॅपकिन फडकवणारेच खूप झाले. तसेच त्यांचे दुर्दैव असं की, आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री, मंत्री पदासाठी नवनवीन जॅकेट शिवली ती देखील जुनी झाली.

अखेर पटोलेंनी आंबेडकरांना सगळ्यांसमोरच बसविले अन् हाताला धरुन महाविकास आघाडीत आणले!

नवीन नवीन नॅपकीन घेतले ते देखील घामाने भिजले. पण मंत्रीपद काही मिळत नाही. काय करायचं त्यांच्यासाठी? पण त्यांना माहिती नाही की, रायगड ही गद्दारांची भूमी नाही. कारण निष्ठावंतांची भूमी असलेल्या याच रायगडमध्ये गद्दारांना टकमक टोक दाखवणारा रायगड किल्ला देखील येथेच आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भरत गोगावले यांना चांगलाच टोला लगावला.

…नाहीतर 6 डिसेंबर करण्यास हिंदू तयार; ‘ज्ञानवापी’वरुन नितेश राणेंना थेट इशाराच

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील टीका केली. भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे गोमूत्रधारे हिंदू जे आलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. त्यासाठी रायगड मधून आपलाच खासदार आणायचा आहे. पंतप्रधान मोदींचा गेल्या दोन वेळी शिवसेनेने प्रचार केला. त्यामुळे ते एकट्याच्या जीवावर पंतप्रधान झालेले नाहीत.

तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेनाप्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते. तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते? हेही लक्षात ठेवा. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी शिवसेनेचे ऋण विसरु नये. आता ते म्हणत आहेत. मोदीची गॅरंटी आहे. पण ही गॅरंटी म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या तुम्हाला काहीही होणार नाही. अशी गॅरंटी आहे का? असा सवाल त्यावेळी ठाकरेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube