‘आधीच सांगितलं होतं, सरकार आरक्षण देणार नाही’; राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray On Maratha Reservation : मी आधीच सांगितलं होतं, कोणतंही सरकार मराठा आरक्षण देऊ शकणार नाही, कारण त्यासाठी सर्वोच्च न्यायालय, विशेष अधिवेशन अशी मोठी प्रक्रिया असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहे. निवडणुकीसाठी नाशिकच्या मतदारसंघाची राज ठाकरेंकडून चाचपणी सुरु आहे. याचदरम्यान त्यांनी नाशिकमधून माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेटपणे भाष्य केलं आहे.
ज्ञानवापी मशीद वाद; तळघरात पूजा करण्याच्या निर्णयाला आव्हान; उच्च न्यायालयात आज सुनावणी
राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. पण एक छोटीसी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे. मी जरांगे पाटलांना जेव्हा उपोषणस्थळी भेटायला गेलो तेव्हाचं सांगितलं होतं की, हे होणार नाही हा विषय कायद्याच्या दृष्टीकोनातला विषय आहे. अशा प्रकारचा निर्णय कोणतंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार या गोष्टींचा विचार करणार नाही कारण प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यात कसं करणार आहेत त्यासाठी विशेष अधिवेशन, सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल ही मोठी प्रक्रिया असल्याचं म्हणत आरक्षणावर सरकार निर्णय घेऊच शकत नसल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
राज्यसभेचा सामना : ठाकरे-पवार महायुतीला ‘बाय’ देणार की ‘वचपा’ काढणार?
मराठा आरक्षणासाठी याआधीही मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले होते. आता हे दुसऱ्यांदा मोर्चे काढण्याचं झालं आहे. आपण वस्तुस्थिती तपासून पाहणार आहोत की नाही कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि आपल्याला मोर्चेकरी म्हणून घेऊन जाताहेत एकदा याकडे प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. मुंबईत त्या दिवशी मुख्यमंत्री आले विजयी सभा झाली पण मराठा समाजाला कोणता विजय मिळाला आहे, काही झालेलं नाही त्याचा आनंद तुम्ही साजरा केलात तर मग आता परत उपोषणाला कशाला बसतायं? असा सवाल राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांना केला आहे. तसेच राज्यात ओबीसी-मराठा आरक्षण मुद्द्यात आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत, त्यामुळे या मुद्द्यावर बोलण्यातही काही पॉईंट नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, गटबाजी सर्वच पक्षांमध्ये असते. सत्ताधाऱ्यांची दिसत नाही अन् विरोधकांची दिसून येते. आत्ता लोकसभा निवडणुका आहेत पण विधानसभा महापालिका निवडणुका येऊ द्यात मग दिसेल त्यांच्यातले तडे. आमचा उघडा कारभार आहे त्यामुळे आमची गटबाजी दिसते. ठराविका लोकांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आणि अपयश पदरात पाडून घ्यायंच हे मान्य नाही मला त्यामुळे मी निवडणूक लढवत नाही. ती पोहोच जर नसेल तर ती पत्त्यांची कॅट पिसल्यासारखं आहे. बाहेरही अनेक लोकं आहेत त्यामुळे मी थोडासा विचार करणार असून सध्या मतदारसंघात चाचपणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.