वाघाचं कातडं पांघरलेला हा लांडगा होता; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा घणाघाती वार

तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना गद्दार म्हणत दम भरला.

News Photo   2026 06 28T182459.586

वाघाचं कातडं पांघरलेला हा लांडगा होता; ओमराजे निंबाळकरांव उद्धव ठाकरेंचा घणाघाती वार

अनेकजन म्हणतात उद्धव ठाकरे (Nimbalkar) फिरत नाहीत, आता उद्धव ठाकरे फिरायला लागल्यावर काय होत ते दिसतय दोन दिवसांपासून. उद्धव ठाकरे फिरायला लागल्यावर आता गद्दारांचं सगळच फिरणार असा थेट घणाघात करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेला सुरूवात केली.ते आयोजीत सभेत बोलत होते.

तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना गद्दार म्हणत दम भरला. आज माझ्यासोबत निष्ठावान खासदार आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा मोदींच्या तोंडावर फेकून आलेले लोक माझ्याकडं आहेत असं म्हणत त्यांनी खासदार अरविंद सावंत यांचं कौतूक केलं. त्याचबरोबर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचंही कौतूक ठाकरे यानी यावेळी केलं.

फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत म्हणून त्यांचे पंख छाटण्याचे काम भाजपमध्ये सुरु; ठाकरेंचा मोठा दावा

जेव्हा मी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हा मला यांनी न येण्याची वेगवेगळी कारणं दिली होती. तेव्हा मी यांना म्हटलो नका येऊ. मात्र जेव्हा यांचे चेहरे मला व्हिडीओमध्ये दिसायला लागले, तेव्हा मी ओमराजे निंबाळकरांना विचारलं, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुमच्यावर काही तणाव आहे का? की रात्री झोप झालेली नाहीये? तेव्हा ते म्हणाले नाही माझं सगळं बरोबर आहे, मी ठीक आहे, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, वाटलं काही तरी गडबड आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओमराजे निंबाळकर यांना जपण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला. खोट कशाला सांगू? अगदी खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री, मध्यरात्री दीड वाजता, मी कैलास पाटील आणि वरून सरदेसाई यांना त्यांना भेटण्यासाठी पाठवलं होतं, मी त्यांना हे देखील म्हणालो होतो, मला ओमराजे पाहिजे त्यांना खासदार पाहिजे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.

मी तुमची माफी मागतो

ओमराजे यांची एक-एक प्रकरण समोर येत आहे. मला हे अगोदर माहिती असतं तर मी ओमराजे यांना कधीच उमेदवारी दिली नसती. आता त्यांची भयानक प्रकरणं समोर येत आहेत. असा माणूस आपण कसा पोसला? असा प्रश्न आता मला पडतो. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. मी त्यांना उमेदवारी दिली नसती तर तुम्ही त्यांना मतं दिली नसती. ही कीड वाढलीच नसती, अशी टीका उद्धव टाकरे यांनी केला.

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा

खंडोची खोपडे, सूर्याजी पिसाळ यांचे नाव घेतल्यावर तुम्ही गद्दार म्हणता. आता चारशे वर्ष झाली त्या दोघांच्या कपाळावरचा डाग पुसला गेला नाही. मला सोडून गेलेल्या खासदारांच्या कपाळावरचा डाग कसा पुसला जाणार. मला ओमराजे यांचा अभिमान होता. परभणीत माझा एका बाजूला खासदार होता, दुसऱ्या बाजूला आमदार होता. धाराशीवमध्येही असेच चित्र होते. एका बाजूला कैलास होते तर दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर होते. हे दोन वाघ आहेत, असे मी म्हणायचो. परंतु ओमराजे निंबाळकर हे वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा होता, हे मला तेव्हा दिसलं नाही, असे म्हणत त्यांनी धाराशीवच्या मतदारांची माफी मागितली.

Exit mobile version