फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत म्हणून त्यांचे पंख छाटण्याचे काम भाजपमध्ये सुरु; ठाकरेंचा मोठा दावा
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडाच्या
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते फुटीर खासदारांच्या मतदारसंघात मेळावे घेत आहे. आज उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदार संजय जाधव यांच्या परभणीत आयोजित मेळाव्यात बोलताना पुन्हा फुटीर खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याने त्यांचे पंख छाटण्याचे काम भाजपमध्ये सुरु असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
परभणीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, गटबाजी शिवसेनेत (Sivsena) नसून भाजपमध्ये (BJP) गटबाजी आहे. हे ऑपरेशन टायगर (Operation Tiger) नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याने भाजपमध्ये त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरु आहे. काल, परवा माझ्यासोबत फडणवीस विमानात बसलेले होते पण ते हतबल झाले होते. कळतच नव्हतं हे मुख्यमंत्री आहे. असा काय झाला. आत्मविश्वास गमावलेला माणूस. आपले पंख कापतायेत. कापणारे देखील आपलीच माणसे आहेत हे त्यांना कळतंय. यापूर्वी देखील भाजपने नितीन गडकरीचे पंख छाटण्याचे काम केले आहे. गडकरी देखील पंतप्रधान होण्याचे शर्यतीत होते पण भाजपने त्यांचे पंख छाटले आणि त्यांचे निष्ठेत इथेनॉल मिसळलं असं या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
ही तर बाबरांची औलाद
तर दुसरीकडे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला. आता नवीन भाजप जन्माला आली आहे. बाबर जनता पार्टी ही बाबरांची औलाद आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भारतीय संघ ‘या’ देशाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार नाही; BCCI ने फेटाळला प्रस्ताव –
तुम्हाला मंदिर बांधायचं नव्हतं. तुम्हाला रामाच्या नावाने लूट करायची होती. हिंदुंना जय श्रीराम म्हटलं तर असाच भूलून जातो. जगातील तमाम हिंदुंशी केलेली गद्दारी आहे. कॉकरोच जनता पार्टी जन्माला आली आहे. तशी नवीन भाजप जन्माला आलीय. बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे. त्याने ते मंदिर लुटलं हे देखील मंदिर लुटत आहे. हे बाबर जनता पार्टीचे आहेत का? त्यांना पाठिंबा द्यायला हे गद्दार गेले का? असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.