राज्यातल्या राजकीय उलापालथीनंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं आहे. मागील एक वर्षांत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत घेणार आहेत. ही घणाघाती मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै रोजी होणार आहे. या मुलाखतीचा टिझर शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात या टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे.
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत!
"आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!"
आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ४ | प्रोमो – Shivsena Podcast Part 4 – Promo
सहभाग:
माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुखनिवेदकः
श्री. संजय राऊत,
खासदार व कार्यकारी संपादक – सामनाभाग… pic.twitter.com/5critjy6V6
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 24, 2023
या ट्विटमध्ये “वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा” असं कॅप्शन देत हा मुलाखतीचा चौथा प्रोमो असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, सरकार कोसळलं, हिदुत्व, राम मंदित, पाठीत खंजीर, दिल्लीला मुजरा, या मुद्द्यांसह लोकशाही वाचवणारच असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत…
उद्धव ठाकरेची तुम्हाला भीती का वाटत आहे, मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर संपवा मग बघुया, उद्धव ठाकरे फक्त एकटा नाहीतर वडिलांचे आशिर्वाद आणि जनतेची साथ अन् तुमची ताकद, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला खुलं आव्हानच दिलं आहे.
ही मुलाखत सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत घेणार असून मुलाखतीचा पहिला भाग 26 जुलैला सकाळी 8 वाजता तर दुसरा 27 जुलै रोजी सकाळी 8 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दिल्लीकरांना RO चे मोफत पाणी, केजरीवालांची ‘वॉटर एटीएम कार्ड’ योजना
उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळून वर्ष झालं असून या वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाकडे गेले आहे. मात्र, खरी आमचीच शिवसेना असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. याच राजकीय घडामोडी सुरु असताना आता महाविकास आघाडीमधला मोठा पक्ष समजला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थकांना घेऊन सत्तेत गेले आहेत. आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची ही वर्षातील दुसरी मुलाखत होणार असून या मुलाखतीमध्ये सत्ताधारी भाजप सरकारवर असलेला रोष उद्धव ठाकरे व्यक्त करणार असल्याचं प्रोमोवरुन दिसून येत आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या या घणाघाती मुलाखतीकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.