Download App

‘न्याय मागण्यासाठी मराठी माणूस सूरतला जाणार का…?’ मराठा आरक्षणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil Maratha Reservation issue : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर संतापले, मराठा आरक्षणावरून…

“मराठ्यांना आतापर्यंत वापरुन घेतलं. न्याय मागण्यासाठी मराठी माणूस सूरतला जाणार का?, मराठी माणूस न्याय मागण्यासाठी मुंबईतचं येणार”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. “मुंबई मराठी लोकांची राजधानी आहे. आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत. सत्ता आल्यास काही दिवसांत न्याय देऊ म्हणणारे आता सत्तेत आहेत. मराठ्यांना देण्यासाठी माझ्या हाती काही नाहीय. युतीमध्ये सध्या घमासान चालू आहे. सरकारने हा प्रश्न सोडवला पाहिजे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

तुम्ही माजलेली औलाद दिसताय; CSMT वर गोंधळ घालून गालबोट लावणाऱ्यांना जरांगेंनी झापलं

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही? यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले की, “या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितले होते त्यांना विचारले पाहीजे. मी काही बोललो तरी ते काय करतील…मराठ्यांना आतापर्यंत फसविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे सांगण्यात आले होते. ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आहे आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार हे महत्त्वाचे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

जपानचा अमेरिकेला दणका! अब्जावधी रुपयांची मोठी डील थांबवली; मोदींच्या जपान भेटीचा इफेक्ट?

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काेणत्या?

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुढील मागण्या सरकारकडे केल्या आहेत- मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

तब्बल 78 क्विंटल तंबाखू अन् 200 टन सुपारी, राहुरीत साडेआठ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर पोलिसांची धाडसी कारवाई

सरकारची भूमिका काय?
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही. ओबीसींमध्ये आधीच 350 जाती झाल्यात. मराठ्यांना स्वतंत्र 10 टक्क्यांचे आरक्षण दिलेय. मेडिकलला ईसीबीसीचं कट ऑफ ओबीसींपेक्षा कमी. अभ्यास करुन मराठा आरक्षणाची मागणी करा, अशी भुमिका मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर सरकारने घेतली आहे.

follow us