तुम्ही माजलेली औलाद दिसताय; CSMT वर गोंधळ घालून गालबोट लावणाऱ्यांना जरांगेंनी झापलं

  • Written By: Published:
तुम्ही माजलेली औलाद दिसताय; CSMT वर गोंधळ घालून गालबोट लावणाऱ्यांना जरांगेंनी झापलं

Mumbai Manoj Jarange Maratha Reservation Protest Update :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarane) मोठ्या जनसमुदायासह मुंबईतील आझाद मौदानावर दाखल झाले असून, जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाला गोंंधळ घालून गालबोट लावणाऱ्या आंदोलकांना मनोज जरांगेंनी मंचावरून झापत शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा

CSMT वरच्या माकडांना आवरा

मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अनेक आमदार आझाद मैदानात (Azad Maidan) दाखल होत असून, आमदार बजरंग सोनावणे भेटीसाठी आले असता जरांगेंनी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी जरांगेंनी रस्त्यावरील गाड्या मोकळ्या करा. मुंबई जाम करू नका असे आवाहन केले. तर, सीएसएमटीवर कोणाचे पोरं आहेत? कोण गोंधळ घालतंय? तुम्ही माजलेली औलाद दिसताय असे खडेबोल सुनावत २५-३० लोकांमुळे अडचण निर्माण करू नका. गोंधळ घालणारी लोकं आपली नाहीत. त्यामुळे  सीएसएमटीचे कोण लोक आहेत ते बघा आणि त्यांना समजावून सांगा असे जरांगेंनी अन्य आंदोलकांना सांगितले. तसेच सीएसएमटीला जाऊन या कोण आहेत ते पोरं ओळखा. सीएसएमटीवरच्या माकडांना आवरा, असे त्यांनी म्हटले आहे.

शांत राहा सांगणाऱ्या संरपंचालाच उलट उत्तरं

“तिकडे फक्त पंचवीस-तीस जण माकडं आहेत. त्यांच्यामुळे आपले लोक अठरा किलोमीटरवर अडले आहेत. आंदोलनाला दोन टक्केसुद्धा लोकं आलेली नाहीत. अजून ९८ टक्के लोक मुंबईबाहेर थांबले आहेत. त्या भंगार पोरांना सरपंचांनी शांत राहा असं सांगितलं तरी त्यांनी सरपंचांनाच उलटं बोलायला सुरुवात केली. म्हणजे ते आपल्यातले नाहीत,” असे जरांगे संतापून म्हणाले.

त्यांनी पुढे मराठा समाजाला आवाहन करताना म्हटले – “मी गोडीत तुम्हाला आरक्षण आणून देतो, तुम्ही शांतता ठेवा.”

उद्धव ठाकरे, शरद अन् अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा; वाचा, कोणत्या नेत्याने दिली साथ..

आंदोलक थेट रेल्वे रूळावर 

मनोज जरांगेंना हायकोर्टाने आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांसह केवळ एक दिवस आंदोलक करण्याची परवानगी दिली आहे. आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाली. काही आंदोलकांनी हलगीच्या तालावर जल्लोष केला तर, काही आंदोलनकर्ते थेट रेल्वे रुळावर उतरल्याचे पाहण्यास मिळाले. त्यानंतर अशाप्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्यांना जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरून खडेबोल सुनावले आणि २५-३० लोकांमुळे अडचण निर्माण करू नका. गोंधळ घालणारी लोकं आपली नाहीत. त्यामुळे  सीएसएमटीचे कोण लोक आहेत ते बघा आणि त्यांना समजावून सांगा असे जरांगेंनी अन्य आंदोलकांना सांगितले. तसेच सीएसएमटीला जाऊन या कोण आहेत ते पोरं ओळखा. सीएसएमटीवरच्या माकडांना आवरा, असे त्यांनी म्हटले आहे.

Maratha Protest : जरांगेंचं वादळ मुंबईत; सरकराच्या हालचाली सुरू, पहिली प्रतिक्रिया आली

जरांगेंच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

1. मराठा आणि कुणबी एकच आहेत, या शासनाने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी.

2. हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थानचे गॅझेटियर आणि तत्कालीन बॉम्बे गव्हरमेंटचे गॅझेटियर हे तीन गॅझेटियर लागू करून अंमलबजावणी करा. आता अभ्यास सुरू आहे, हे आम्ही ऐकून घेणार नाही.

3. सयेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी दीड वर्षांचा वेळ सरकारला दिला, आता आम्ही थांबणार नाही. ज्याची कुणबी नोंद सापडेल, त्याला प्रमाणपत्र द्या, ओबीसींच्या विरोधाकड लक्ष देऊ नका.

4. मराठा आरक्षणाच्या लढ्यावेळी ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतो, असं आश्वासन सरकारने दिलं होतं. मात्र अजून हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.

5. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक निधी अजूनही मिळालेला नाही. हे तात्काळ मिळावे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube