Bhaskar Jadhav Emotional Letter After Close Workers : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) पक्षाचे आमदार भास्कर जाधव सध्या राजकीय अडचणींना सामोरे जात (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांनी एकामागून एक साथ सोडत वेगळी राजकीय वाट धरल्याने मतदारसंघात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्के बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर पत्र (Shiv Sena) लिहीत मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत.
भास्कर जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
भास्कर जाधव यांनी पत्रात लिहिलंय की, मित्रांनो, मीही माणूस आहे, मला सुद्धा मन आहे. मी आक्रमक आहे, पण तितकाच संवेदनशील देखील आहे. गेलेली माणसं जीवाभावाने जोपासलेली होती, ती घर सोडून गेली, तर वेदना होणारच!
सभागृहात 42 सेकंद नाही, तब्बल 22 मिनिटं रम्मी खेळले! कोकाटेंची चौकशी अहवालाने केली पोलखोल
जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राजकारण त्यांना कोणी शिकवण्याची गरज नाही. मागील 40 वर्षे ते राजकारणात आहेत. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची ताकद आहे. एक गेला तर चार निर्माण करेन, असं म्हणत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.
कार्यकर्त्यांच्या जाण्यावर नाराजी
भास्कर जाधव म्हणाले की, गेलेले कार्यकर्ते आता मतदारांना फोन करून सांगत आहेत की, आम्ही विकासासाठी नवीन वाट धरली आहे, तुम्हीही आमच्यासोबत या. पण मतदारांनी अशा ‘भूलथापा’ किंवा खोट्या प्रलोभनांना बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं. विकासासाठी गेलो म्हणणारे आधी काय विकास करून दाखवले? किती निधी आणला? आणि आता काय आणणार आहेत? याचा विचार करा. यांचा खरा हेतू ओळखा, असं आवाहन त्यांनी केलंय.
काँग्रेसच्या नव्या रणनितीची सुरुवात! सपकाळ टीमला दिल्लीतून हिरवा झेंडा
भास्कर जाधव यांनी आपल्या मतदारसंघात लवकरच गावी आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर जाहीर सभा घेण्याचं सूतोवाच केलं आहे. त्यावेळी प्रत्यक्ष भेटू आणि खूप काही बोलू, असं सांगत त्यांनी आगामी काळात स्पष्ट भूमिका मांडण्याचा इशारा दिला आहे. या जाहीर पत्रातून भास्कर जाधव यांनी आपल्या समर्थकांशी अत्यंत स्पष्ट संवाद साधला आहे. राजकीय मैदानात परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मतदारांनी समजून उमजून निर्णय घ्यावा. खोटेपणाच्या नादी लागू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.