काँग्रेसच्या नव्या रणनितीची सुरुवात! सपकाळ टीमला दिल्लीतून हिरवा झेंडा

काँग्रेसच्या नव्या रणनितीची सुरुवात! सपकाळ टीमला दिल्लीतून हिरवा झेंडा

Maharashtra Congress New Executive Committee : महाराष्ट्र काँग्रेसने ( Maharashtra Congress) अखेर आपली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेल्या हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतर अधिकृतपणे (Maharashtra Politics) जाहीर करण्यात आली.

या नव्या टीममध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसह तरुण अन् नव्या दमाचे चेहरे सामाविष्ट करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

राजकीय समीकरणे आणि टीमचा आराखडा

ही कार्यकारिणी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी निवडणूक रणनीती आणि सामाजिक प्रतिनिधित्व लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत नेतृत्व, संघटन कौशल्य, अनुभवी मार्गदर्शन आणि तरुणांचा जोश असा समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.

लग्नाचे योग, नोकरीत प्रमोशन; आज ‘या’ तीन राशींना करिअरमध्ये छप्पर फाड यश

नव्या कार्यकारिणीतील महत्त्वाचे चेहरे:

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे:

रमेश चेन्नीथला – अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्रप्रमुख (इन-चार्ज) व चेअरमन
हर्षवर्धन सपकाळ – नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष
विजय वडेट्टीवार – विरोधी पक्षनेते
सतेज उर्फ बंटी पाटील
मुकुल वासनिक
अविनाश पांडे
बाळासाहेब थोरात
सुशीलकुमार शिंदे – माजी केंद्रीय गृहमंत्री
पृथ्वीराज चव्हाण – माजी मुख्यमंत्री
रजनी पाटील
मानिकराव ठाकरे
नाना पटोले – माजी प्रदेशाध्यक्ष
वर्षा गायकवाड
इमरान प्रतापगढी
सुनील केदार
डॉ. नितीन राऊत
अमित देशमुख
यशोमती ठाकुर
शिवाजी मोघे
चंद्रकांत हंडोरे
अरिफ नसीम खान
प्रणिती शिंदे
मुजफ्फर हुसैन
के. सी. पडवी
अस्लम शेख
विश्वजित कदम
कल्याण काळे
प्रा. वसंत पुरके
अमिन पटेल

मोठी बातमी! सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण; रिया चक्रवर्तीला कोर्टाने बजावली नोटीस

विभागीय संघटनांचाही समावेश

नव्या कार्यकारिणीत पक्षाच्या विविध अंगिकृत संघटनांचे अध्यक्षही आहेत:
अध्यक्ष – महिला काँग्रेस
अध्यक्ष – युवा काँग्रेस
सेवा दलाचे मुख्य समन्वयक (Chief Co-ordinator)
NSUI (विद्यार्थी काँग्रेस) अध्यक्ष
INTUC (कामगार संघटना) अध्यक्ष
SC विभागाचे अध्यक्ष
अ‍ॅड. गणेश पाटील – संयोजक

रशिया हादरला! 8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका वाढला

काँग्रेससाठी नवसंघटनाचा टप्पा?

या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून काँग्रेसने संघटनेला मजबुती देण्याचा आणि प्रत्येक समाजघटकाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. अनुभवी नेत्यांची उपस्थिती पक्षाला स्थैर्य देईल, तर नव्या चेहऱ्यांच्या सहभागामुळे जनसंपर्क वाढण्यास हातभार लागेल, अशी काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube