Udhhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhhav Thackery) यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या अडीच वर्षांत कोणत्या ना कोणत्या धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे देखील आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान, ते ओबीसी विरोधात षडयंत्र…; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर हे चर्चेत आहेत. ते म्हणजे जोगेश्वरीतील कथेत घोटाळ्यांच्या आरोपांमुळे. त्यांची इडी चौकशी देखील सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलं होतं. त्यानंतर आता वायकर थेट शिंदे गटात जाणार आहेत अशी बातमी समोर आली आहे.
राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान, ते ओबीसी विरोधात षडयंत्र…; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आमदार नेमका कोण? हे अद्याप समोर आले नव्हते. ही बातमी आल्यानंतर रवींद्र वायकर हेच ते आमदार असणार आहेत. जे ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशादरम्यान वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख यांना तयारीत राहण्याचे आदेश देखील देण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वायकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत केल्या काही दिवसांपूर्वी एक गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. याच बैठकीमध्ये वायकर यांनी शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यासाठी मला लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. असे वायकरांनी शिंदे यांना सांगितले तर सांगितले जात आहे.