Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीस कोर्टात सुरुवात झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. (Murder) त्यांनी आपल्या युक्तीवादातून संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कोर्टात मांडला. तसंच, या घटनेमागील मास्टरमाइंड कोण? त्याची माहिती न्यायालयात उपलब्ध कागदपत्रांवरुन दिली. तसंच, यावेळी आरोपींच्या वकिलांना सर्व कागदपत्रे देण्यात आली. उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद झाल्यावर आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद झाला.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुरु झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तीवाद सुरु झाला. युक्तीवादात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. उज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली.
बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख पॅटर्न! 2 दिवस डांबून ठेवत क्रूरपणे मारहाण, 25 वर्षीय तरूणाची हत्या
नांदूर फाटा येथील हॉटेल 1 डिंसेबरला तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली. संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने मार्गदर्शन केले. सीडीआर रिपोर्टमधून ही माहिती बाहेर झाली. यामध्ये गँग लिडर हा सुदर्शन घुले आहे. त्याला वाल्मीक कराड यानेच गाईड केले. सीडीआरमधून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीन वेळा फोन केला.
उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती अन्, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असे निकम यांनी युक्तीवादात सांगितले. तत्पूर्वी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकील पत्र न्यायालयासमोर सादर केले. 12 मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने मागितले होते. चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट आरोपीच्या वकिलांना देण्यात आले.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील केस संदर्भातील कागदपत्रे न्यायालयापुढे सादर केली. सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते. आरोपींच्या वकिलांना जवळ जवळ सहाशे पाने कागदपत्रे देण्यात आली. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.