‘उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती अन्…’, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare On Ujjwal Nikam : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्य सरकारने मोठा निर्णय घेत प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र या नंतर विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट करत उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची केस लढली होती हे कृपया विसरून चालणार नाही. उज्वल निकम यांनी भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढली आहे हे देखील विसरुन चालणार नाही तसेच त्यांनी लढलेल्या केसेसमध्ये न्याय मिळत नाही असं देखील त्यांनी या पोस्टमध्ये सुचित केले आहे.
या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या. 29 सप्टेंबर 2006 रोजी नागपूर पासून 37 किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावामध्ये भोतमांगे हत्याकांड घडले होते. सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झाले. हल्ल्यातून बचावलेल्या गजभियेने कामठी गावात जाऊन पोलिसात तक्रार दिली आणि या तक्रारीमध्ये साक्षीदार भैयालाल भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे झाले. गावकऱ्यांनी राग मनात धरला आणि भोतमांगेच्या झोपडीवर हल्ला चढवला यात पत्नी सुरेखा मुलगी प्रियांका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांच्या हत्या झाल्या. अल्पवयीन प्रियंका हिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करून हालहाल करून मारले गेले.
या प्रकरणात सरकारी वकील नेमले होते उज्वल निकम. या प्रकरणात एकूण 40 आरोपी होते. चाळीस वरून त्यांची संख्या 11 वर गेली. फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही. खटला चालू असतानाच 11 पैकी दोघांचे मृत्यू झाले. कुटुंबातला शेवटचा माणूस भैय्यालाल न्याय मागता मागता 2017 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला.
एडवोकेट उज्वल निकम प्रकाशझोतात आले ते अजमल कसाब केसमुळे. पण लक्षात घ्या कसाबच्या केसमध्ये कोणीही वकील असता तरी कसाबला फाशीचं झाली असती. कारण त्याच्या विरोधात प्रचंड पुरावे होते आणि राष्ट्रविरोधी कारवाई मध्ये तो घटनास्थळी सापडला होता. याच अजमल कसाबच्या केसमध्ये अजून दोन लोक होते फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद ज्यांच्या खिशामध्ये राजभवन चा नकाशा सापडला होता अन हे दोन आरोपी सुटलेले आहेत हेही कृपया लक्षात घ्यावे. एडवोकेट उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती हे कृपया विसरून चालणार नाही. तसेच उज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली.
गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष त्याच भाजपचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत आणि ते गृहमंत्री असतानाच परळी किंवा बीडमध्ये पोलिसांचा हैदोस चालू असतो हे विसरून चालणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फ्या केलेल्या नाहीत.
मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन ‘चिकी चिकी बुबूम बुम’, ‘या’ दिवशी होणार रिलीज
तरीसुद्धा आपल्या केस मध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या पिडीत कुटुंबाचा असतो त्यामुळे उज्वल निकमांची नियुक्ती ही जर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना हवी असेल तर तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे आणि आपण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे. असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.