Download App

ही महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार -आठवले

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. सर्व विरोधीपक्ष एकत्र

  • Written By: Last Updated:

Ramdas Athawale Meets Santosh Deshmukh family : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे (Ramdas Athawale) या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच, हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबद्दल मी सांगणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतानाच बीडमधील नागरिकांकडून देखील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यानंतर आज मंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे. केवळ प्रॉपर्टी जप्त करून चालणार नाही. आरोपी पकडायला एवढा वेळ लागतो ही चांगली बाब नाही. वीस दिवस उलटूनही नातेवाईकांचं अजूनही स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी बोलणार आहे, असं आठवले म्हणाले.

follow us