देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..
Ramdas Athawale in Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांचा सहभाग असल्याचा आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडे कोंडीत सापडले आहेत. एकूणच बीडमधील प्रकरण तापलेलं (Ramdas Athawale) असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्रिय झालेल्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीडमध्ये भेट घेतली आहे.
सरेंडर करण्याशिवाय पर्याय उरलाच नाही; वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बीडमध्ये आहेत . जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली .त्यानंतर संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांच्या सांत्वनही केलं. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड शासकीय विश्रामगृहात मंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रकरणी प्रमुख मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुद्धा होत आहे. यापूर्वीच रामदास आठवले यांनी सुद्धा अशी मागणी केली होती मात्र आज त्यांनी मस्साजोगमध्ये पोहोचून देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले.
वाल्मिक कराडांवर दबाव वाढला
पवनचक्की मालकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणात रडारवर असलेल्या वाल्मीक कराड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडून सध्या वेगाने तपास सुरु आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित महिलांची विविध पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली. याप्रकरणात आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मीक कराडच्या अनेक निकटवर्तीयांचा समावेश आहे.
चौकशीला बोलावणार?
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपास करत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मनी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तर वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी दोन महिलांची देखील काल सीआयडीच्या पथकाने चौकशी केली.