Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने (Maratha Reservation) पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांच्या तोडफोडीचीही चर्चा सुरू आहे. यातच आता सदावर्ते यांचा भाजपाशीही संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे याचे उत्तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या वक्तव्यातून समोर आले आहे. गुणरत्न सदावर्ते हे कोण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचा आणि भाजपाचा काहीच संबंध नाही, असे विधान मंत्री दानवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले.
येथे येऊन सांगू शकत नाही, आता तेथून काय सांगणार? जरांगेंचा पंतप्रधानांवरच निशाणा
ते पुढे म्हणाले, गुणरत्न सदावर्ते कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं होतं. त्याला आव्हान देणारा हा माणूस आहे. त्याने मराठा आरक्षणाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर हे आरक्षण रद्द झालं. आता हेच रद्द झालेलं आरक्षण पुन्हा समाजाला मिळवून द्यायचं आहे. अन्य कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. अन्य समाजाचं आरक्षण जसच्या तसं ठेऊन मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हा प्रयत्न जर यशस्वी झाला आणि न्यायालयाने मान्य केलं तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
तोडफोडीचं समर्थन नाहीच – जरांगे पाटील
काल मुंबईत सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड झाली. या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी कालच प्रतिक्रिया दिली होती. मनोज जरांगे म्हणाले, मला काहीच माहिती नाही. मी आताच झोपेतून उठलो. मराठा शांततेत आंदोलन करत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. कुणी जर गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. सरकारने आता आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते. यानंतरही दिवसभरात या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया येत होत्या.
Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल