पायधुणीतील कलिंगड प्रकरणाचा उलगडा; चौघांच्या शरीरात सापडलं उंदीर मारण्याच्या औषधातील झिंक फॉस्फाईट

फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून, चौघांचीही मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Untitled Design 88

Untitled Design 88

Unraveling the Kalingad case in Paydhuni : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकडिया कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल 11 दिवसांच्या तपासनानंतर फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून, चौघांचीही मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. 26 तारखेला काही तासांच्या अंतरात डोकडिया कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अब्दुल्ला डोकडिया, त्यांची पत्नी नसरीन डोकडिया, मुलगी आयशा आणि झैनब यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर सुरूवातीला कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

कारण मृत्यूपूर्वी या चौघांनी रात्री कलिंगड खाल्ले होते आणि त्यानंतर त्यांना उलट्या व त्रास सुरू झाला होता. घटनेनंतर चौघांना प्रथम फॅमिली डॉक्तरांकडे नेण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच अवघ्या काही तासांत चौघांचीही मृत्यू झाला आणि या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. दरम्यान, या प्रकरणात कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या तज्ज्ञांनी मृतदेह, उलट्यांचे नमुने आणि कलिंगडाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.

भुजबळ, परांजपे की आणखी कोणी ? राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच…

सुरूवातीच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नव्हती. मात्र आता समोर आलेल्या अंतिम अहवालात चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाईटचे अंश आढळले आहेत. विशेष म्हणजे कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाईटचे अंश सापडल्याची माहिती समोर आली आहे. झिंक फॉस्फाईट हे उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत घटक रसायन आहे. हे शरीरात गेल्यानंतर तीव्र विषबाधा होते. उलट्या, श्वास घेण्यास त्रास आणि अंतर्गत आवँयक निकामी होण्याची शक्यता निर्माण होते. डॉक्टरांच्या मते, चौघांना झालेल्या सततच्या उलट्यांमुळे काही प्रमाणात विष शरीराबाहेर पडले होते. त्यामुळेच तपासादरम्यान त्यांच्या शरीरात या रसायनाचे अंश आढळून आले.

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे विष चौघांच्या शरीरात नेमकं कसं गेलं? ही सामूहिक आत्महत्या होती की कोणीतरी जाणीवपूर्वक विष देऊन हत्या केली? या दोन्ही शक्यतांचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड, घरातील वस्तू, अन्नपदार्थ आणि आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा अन्नसुरक्षा आणि विषारी पदार्थांच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस आता या प्रकरणातील प्रत्येक शक्यता तपासत असून, डोकडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे खरे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version