भुजबळ, परांजपे की आणखी कोणी ? राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच…
NCP Rajyasabha-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पहिल्या क्रमांकावर चर्चेत आहे. छगन भुजबळ हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.
NCP Rajyasabha seat: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यसभा ( Rajyasabha) सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवरून राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस असणार आहे. त्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. या जागेसाठी कुणा-कुणाचे नावे चर्चेत आहेत. हे पाहुया…
छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पहिल्या क्रमांकावर चर्चेत आहे. छगन भुजबळ हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह यांनी भुजबळ यांना लोकसभा लढविण्यास सांगितली होती, असे खुद्द भुजबळ यांनीच जाहीर केलं होते. परंतु मराठा-ओबीसी वादामुळे भुजबळ यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिला होता. त्यानंतर भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या नावाला पसंती मिळू शकतो. छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यावर येवलातून समीर भुजबळ हे विधानसभा निवडणूक लढतील. सध्या वर्षभरापासून मतदारसंघात समीर भुजबळ कारभार पाहत आहेत. पुतण्याचे येवल्यातील राजकारण सेट होण्यासाठी छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाऊ शकतात. त्यातून ओबीसीचा चेहरा राज्यसभेवर पाठविल्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.
माजी खासदारांची नावेही चर्तेत
चार माजी खासदारांची नावेही शर्यतीत आहेत. माजी खासदार व राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, विदर्भातून माजी खासदार सुबोध मोहिते, शिरुरचे माजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे नावे चर्चेत आहेत.
पुण्याच्या नसरापूरपासून हैदराबादपर्यंत नराधमांचा सुळसुळाट; लेडी ‘सिंघम’ ने 3 तासांत 40 लांडगे ठेचले!
अविनाश आदिक, विक्रम काकडे
याबरोबर खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानवले जाणारे माजी खासदार संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांचे नाव चर्चेत आहेत. विधानपरिषदेसाठी विक्रम काकडे हे इच्छुक होते. तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक हेही इच्छुक आहेत. या नावांबरोबर माजी मंत्री नवाब मलिक हेही इच्छुक असू शकतात. पण विधानपरिषदेवर झिशान सिद्दीकी यांना संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा नवाब मलिक यांच्या नाव मागे पडू शकते. तसेच नवाब मलिक यांना भाजपचाही विरोध असतो. पोटनिवडणुकीसाठी एका जणाची निवड करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.