Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल होत असल्याने काल अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची (Unseasonal Rain) नोंद झालीयं. या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
सध्या उत्तर भारताच्या अनेक भागात पाऊस कोसळत असून या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलायं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरुन येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या काही नैसर्गिक कारणांमुळे राज्यात मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस, विशेषत: राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत; जमीन गैरव्यवहार प्रकरणात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल
मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अधिक प्रभाव असणार आहे. त्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणमध्ये मुंबई पालघर वगळून इतर भागांनाही इशारा देण्यात आलायं.
तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांना यलो अलर्ट देण्यात आला असून आज पावसाची अधिक ची तीव्रता अधिक असेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
रोहिणी खडसे खरात प्रकरणावर संतापल्या! ‘समन्स देऊन उपयोग नाही, थेट अटकेशिवाय सत्य बाहेर येणार नाही’
जळगाव, नाशिक, नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आदी भागांना मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून यावेळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाफळेतील अवैध मुरूम उपसा प्रकरणात मोठी कारवाई; लाच स्वीकारताना तलाठी सुदर्शन जाधवला रंगेहात पकडले
दुपारच्या सुमारास बाणेर, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बाणेर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागात पाणी साचले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही पावसाने अर्धा तास अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता, मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
