Download App

Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

Unseasonal Rain : राज्यात कडाक्याची थंडी पडत असतानाच अनेक ठिकाणी (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने एन्ट्री घेतली आहे. सांगली आणि कोल्हापुरात मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मुंबई पुण्यासह आणखी काही शहरांत पावसाचा अंदाज (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि पुढील दोन ते तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, अशी शक्यता आहे. आज पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार, पुढील 72 तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज 

दोन दिवसात नगर शहरात पावसाची एन्ट्री 

धुळे, नंदूरबार येथेही रविवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत आज आणि उद्या ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या नगर शहरात थंडी वाढली आहे. नगरमध्ये इतकी थंडी कधीच पडत नाही. परंतु, सध्या हवामान बदलाचा अनुभव नगरकर घेत असून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यात आता पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत आज पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. पुण्यात मात्र आज ढगाळ वातावरण राहू शकते.

Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

आजपासून या राज्यांतही पाऊस बरसणार 

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदे आणि छत्तीसगड या राज्यांत आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसामुळे आतापासूनच ढगाळ हवामान होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच या राज्यांतही पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

follow us