Unseasonal rains in Marathwada : सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातलं आहे. सध्या मराठवाड्यात तब्बल १७ दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Marathwada) यामध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण २७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३९१ जनावरे दगावली. तर ४ हजारांहून अधिक हेक्टरवर शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मे महिन्याला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला लागला. खरिपासाठी जमीन तयार करून ठेवण्याचं काम मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सुरू होतं. ३ मेपासून अचानक आभाळ भरून येणं, विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. रोज पाऊस सुरूच आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
बीड जिल्ह्यात अपहरण करून मारहाणीची मालिका थांबेना; माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना
मराठवाड्यात विजा कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, तर २१ जण जखमी झाले. मयतांमध्ये सर्वाधिक ७ जण जालना जिल्ह्यातील आहेत. जनावरांची जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ३९१ लहान- मोठी जनावरं मरण पावली. वादळ वाऱ्याने बीड जिल्ह्यात ३, परभणीत एका घराची मोठी पडझड झाली.
अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या मराठवाड्यात ८४ आहे. अवकाळीने बाधित गावांची संख्या आता ५९७ पर्यंत पोहोचली असून, ७ हजार १४६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्याचबरोबर यामध्ये शेतीपिकांचही मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने जिरायत जमिनीवरील २५१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. १ हजार ८८४ हेक्टर बागायती पिकांचे तर २ हजार ८२ हेक्टरवरील फळबागांमधील पिकांचे नुकसान झालं.
वीज कोसळून २७ नागरिकांचा मृत्यू?
छत्रपती संभाजीनगर -३
जालना -७
परभणी -१
हिंगोली -२
नांदेड -५
बीड -५
लातूर -२
धाराशिव -२
एकूण -२७